Fake_News 
पुणे

सोशल मीडियावर व्हायरल झालेला राज्य सरकारचा 'तो' आदेश 'फेक'; वाचा सविस्तर बातमी!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : लॉकउाडन-४ च्या शेवटच्या टप्प्यात म्हणजे गुरुवारी (ता.२७) बहुतांशी दुकाने सुरू करण्याचा राज्य सरकारचा सोशल मीडियावर व्हायरल झालेला आदेश 'फेक' असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पुणे शहर आणि जिल्ह्यांतील व्यवहारांत कोणतेही बदल होणार नाहीत, असे महापालिका आणि जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

"राज्य सरकारचा कोणताही आदेश आतापर्यंत मिळालेला नाही, असे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितले; तर सोशल मीडियावरील आदेश हा बनावट असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांनी स्पष्ट केले.

लॉकडाउनच्या चौथ्या टप्प्यांत आता आणखी काही दुकाने सुरू होणार असून, त्यानुसार टॅक्‍सी, कॅब, रिक्षांसह काही दुकाने, खासगी कार्यालये, सरकारी कार्यालयातील शंभर टक्के उपस्थिती राहणार आहे, अशा आशयाचा मेसेज सोशल मीडियावर फिरत आहे. तर काही व्यवहारांबाबत आदेशात अस्पष्टता आहे. त्यामुळे नेमकी कोणती दुकाने सुरू होणार का, याबाबत पुणेकरांत उत्सुकता आणि व्यापारी तयारीच्या दृष्टीने हवालदिल झाले आहेत. त्याचवेळी कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना आता लॉकडाउन उठण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.

परिणामी, अशा प्रकारच्या राज्य सरकारच्या आदेशाच्या मेसेजसंदर्भात सर्वत्र उलट-सुलट चर्चा सुरू झाली आहे. तेव्हाच, महापालिका आणि जिल्हा प्रशासनाच्या पातळीवर मात्र कोणत्याच हालचाली सुरू झाल्याने दिसून आले. एवढेच नाही; अशा आदेशाची कल्पनाही या दोन्ही यंत्रणांना नाही. तरीही, या यंत्रणांकडील जबाबदार अधिकाऱ्यांशी संपर्क साधून नेमकी वस्तुस्थिती जाणून घेतली. तेव्हा नवा एकही आदेश नाही; तशी शक्‍यताही नाही. मात्र; लॉकडाउनची मुदत संपल्यानंतर नवे येऊ शकतात, असे गायकवाड यांनी स्पष्ट केले.

त्यामुळे पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागात सध्या जी काही दुकाने अधिकृतरित्या सुरू आहेत, म्हणजे ज्यांना परवानगी आहे; तेवढेच व्यवहार ठराविक वेळेत सुरू राहणार आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EV कडे वाढता कल, पण सुरक्षिततेचा मोठा प्रश्न! दुर्घटनेनंतर मंत्र्यांचा इशारा; चार्जिंगला लावून झोपलेल्या कुटुंबातील 8 जण जिवंत जळाले

Latest Marathi News Live Update : राजकारणात कधीही फुलस्टॉप नसतो - पंतप्रधान नरेंद्र मोदी

Tiger Hunting Video : मृत्यू समोर असताना मोर उडून गेला, पण वाघाच्या तावडीत 'त्या' हरणाच्या पिल्लाचा दुर्दैवी अंत झाला; जबड्यात धरलेली मान पाहून मन हेलावून जाईल!

Gold Rate Today: सोनं आणखी स्वस्त! आठवड्यात 6 हजारांची घसरण; आजचा 1 तोळ्याचा भाव किती?

Hockey World Cup चे बिगूल वाजले! भारत-पाकिस्तान संघात पुन्हा आमने-सामने; १६ संघांचे ग्रुप्स जाहीर

SCROLL FOR NEXT