vr.jpg 
पुणे

आता टाटा स्काय, जिओव्दारे विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाचे धडे?

सकाळवृत्तसेवा

पुणे : कोरोनाचा संसर्ग वाढत असताना दुरदर्शनच्या सहाय्याने राज्याच्या काना-कोपऱ्यात ज्ञानाची गंगा पोचविण्यासाठी राज्य सरकारने तयारी दर्शविली होती. त्यानुसार मागणी करणारा प्रस्ताव देखील केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाकडे पाठविण्यात आला होता. मात्र सातत्याने पाठपुरावा करून देखील केंद्र सरकारने अद्याप कोणतेही उत्तर दिलेले नाही. म्हणूनच आता राज्य सरकारने टाटा स्काय, जिओ या डायरेक्‍ट टु होम (डीटीएच) सेवा देणाऱ्या खासगी कंपन्यांशी संपर्क साधला असून, लवकरच याद्वारे राज्य मंडळाच्या अभ्यासक्रम दाखविण्याची सोय उपलब्ध होणार असल्याचे सुतोवाच शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केले.

शालेय शिक्षण विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाईन पत्रकार परिषदेत गायकवाड यांनीही माहिती दिली आहे. राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने 27 मे रोजी केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाला दुरदर्शन वाहिनीवर शैक्षणिक कार्यक्रमासाठी काही तास द्यावा, अशी मागणी करणारा प्रस्ताव सादर केला होता. त्याबाबत वारंवार पाठपुरावा करण्यात येत आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर दुरदर्शनच्या सहाय्याने शिक्षण सुरू ठेवण्यासाठी पूर्व तयारी विभागातर्फे करण्यात येत आहे. दुरदर्शनवर दाखविण्यासाठी जवळपास एक हजार तासांचे आशय तयार करण्यात आला आहे. मात्र, केंद्र सरकारकडून अद्याप कोणतेही उत्तर दिलेले नाही. त्यामुळे राज्य सरकारने खासगी कंपन्यांची संपर्क सुरू केला. 

गायकवाड म्हणाल्या,""दुरदर्शनच्या सहाय्याने शालेय अभ्यासक्रम घरोघरी पोचविण्याचा आमचा मानस आहे. परंतु त्याला केंद्र सरकारमार्फत कोणतेही उत्तर अद्याप आलेले नाही. केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्याशी संपर्क साधण्यात येत आहे. हे प्रयत्न सुरू असताना विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नयेत, म्हणून आता टाटा स्काय आणि जिओ यावर शैक्षणिक कार्यक्रम दाखविण्याची तयारी सुरू आहे. परंतु दरम्यान दुरदर्शनच्या सहाय्याने प्रत्येक मुलापर्यंत शिक्षण पोचविण्यासाठी स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे जावडेकर यांच्याशी बोलणार आहेत.''

शालेय शिक्षण विभागातर्फे टाटा स्काय आणि जिओ या खासगी डिटीएचच्या माध्यमातून विनामुल्य शैक्षणिक आशय मुलांपर्यंत पोचविण्यात येणार आहे. त्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. लवकरच त्याबाबत अधिक माहिती देण्यात येईल. -विशाल सोळंकी, राज्य शिक्षण आयुक्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: रक्षाबंधनाआधी सोनं स्वस्त! सलग तिसऱ्या दिवशी भाव घसरले, आज 10 ग्रॅमचा दर किती?

Mumbai Local: कर्मचाऱ्यांना लागला लेटमार्क! मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, लोकल खोळंबल्याने प्रवाशांची तारांबळ

LUCKY ZODIAC SIGNS: फक्त ८ दिवस थांबा! ‘या’ ३ राशींचं नशीब अचानक पलटणार; पैसा, यश अन् मोठ्या फायद्याचे संकेत ,तुमची रास कोणती?

Marathi News Live Updates : मॉडिफाइड सायलेन्सरवर पोलिसांचा कडकडीत कारवाईचा बडगा, कर्णकर्कश आवाज करणाऱ्या २२ दुचाकींवर दंडात्मक कारवाई

Sangola Water: पक्ष, गट, राजकारण बाजूला अन् शेतकरी एकवटले! सांगोल्यात पाण्याच्या लढ्याचा ‘सांगोला पॅटर्न’

SCROLL FOR NEXT