TV_Education 
पुणे

लॉकडाउनमुळे राज्य सरकारच्या 'टिव्ही एज्युकेशन'ला बसली खीळ; काय आहे प्रकरण?

सकाळ वृत्तसेवा

पुणे : राज्यातील काना-कोपऱ्यातील विद्यार्थ्यांना टीव्हीद्वारे शिक्षणातील धडे देता यावेत, यासाठी राज्य सरकार गेल्या काही महिन्यांपासून प्रयत्नशील आहे. स्वतंत्र शैक्षणिक वाहिनीचा प्रस्ताव राज्याने लॉकडाऊनपूर्वीच केंद्र सरकारकडे पाठविला होता, परंतु प्रस्ताव मंजूरीच्या वाटेवर असतानाच लॉकडाऊन जाहीर झाला आणि स्वतंत्र शैक्षणिक वाहिनी सुरू होण्यापूर्वीच 'लॉक' झाली.

राज्य सरकारच्या शिक्षण विभागातर्फे स्वतंत्र शैक्षणिक वाहिनी सुरु करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाला देण्यात आला होता. या प्रस्तावाप्रमाणे शैक्षणिक वाहिनी सुरू करण्यासाठी पूर्व तयारी देखील करण्यात आली होती. त्यासाठी आवश्यक आशय, तांत्रिक बाबींची तयारी करण्यात आली होती. परंतु लॉकडाऊन जाहीर झाल्यामुळे गेल्या तीन महिन्यापासून हा प्रस्ताव केंद्र सरकारच्या दफ्तरी फाइल बंद आहे. 

राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे संचालक दिनकर पाटील म्हणाले," कोविड-१९ विषाणूचा संसर्ग वाढण्यापूर्वी केंद्र सरकारकडे स्वतंत्र शैक्षणिक वाहिनीची मागणी करणारा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. प्रस्ताव अंतिम मंजुरीच्या प्रतिक्षेत होता आणि लॉकडाऊन जाहीर झाले. या प्रस्तावाप्रमाणे केवळ शिक्षणासाठी नियमितपणे चोवीस तास शैक्षणिक कार्यक्रम अशा स्वतंत्र वाहिनीचे नियोजन करण्यात आले आहे. यात सर्व वयोगटातील (बारावीपर्यंत) विद्यार्थ्यांसाठी ही वाहिनी असणार आहे. आत्ताही आपण या स्वतंत्र वाहिनीच्या मागणीसाठी पाठपुरावा करत आहोत."

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT