Pune_Police_Home_Minister 
पुणे

पुणे पोलिसांचा 'तो' उपक्रम भविष्यातही सुरू ठेवा; गृहमंत्र्यांनी केल्या सूचना

सकाळ वृत्तसेवा

पुणे : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील पोलिसांनी दाखविलेल्या संवेदनशीलतेने राज्य पोलिस दलाची प्रतिमा उचांवली आहे. विशेषतः पुणे पोलिसांनी लॉकडाऊनच्या कालावधीत पोलिसांच्या मदतीसाठी सुरू साडे पाच हजार विशेष पोलिस अधिकारी नेमण्याचा उपक्रम उत्कृष्ट आहे, यापुढेही हा उपक्रम सुरू ठेवावा, अशा सूचना राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी रविवारी (ता.७) पुणे पोलिसांना दिल्या.

तसेच लॉकडाऊनच्या कालावधीत चुकीची माहिती पसरविणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला.

कोरोना नियंत्रणासाठी लॉकडाऊन कालावधीत पुणे, पिंपरी चिंचवड शहर व ग्रामीण पोलीस विभाग यांच्यावतीने करण्यात आलेल्या आणि भविष्यात करण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी रविवारी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी संवाद साधला. तसेच त्यांच्या अडचणीही समजून घेतल्या. यावेळी पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम, पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील, पोलीस सहआयुक्त (शहर) डॉ. रविंद्र शिसवे, अतिरीक्त पोलीस आयुक्त (गुन्हे) अशोक मोराळे, अतिरीक्त पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, सुनील फुलारी आदी उपस्थित होते. 

कोरोना नियंत्रणासाठी केलेली प्रभावी अंमलबजावणी, नागरीकांसाठी उपलब्ध करुन दिलेल्या सोई-सुविधा, करण्याबरोबपुणे पोलिसांनी निर्जंतुकीकरणासाठी तयार केलेली संजीवनी व्हॅन, कॉन्टॅक्‍ट ट्रेसिंग सेल, कोविड संक्रमित रुग्ण शोधणे व कोरोना प्रतिबंधासाठी केलेल्या विविध उपाययोजनांचे देशमुख यांनी कौतुक केले. ते म्हणाले, पोलिसांनी माणुसकी जपून काम करणे गरजेचे आहे. चांगले काम करणाऱ्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामाची छायाचित्रांसह माहिती संकलित करावी. महाराष्ट्र पोलीस विभागाच्यावतीने तयार करण्यात येणाऱ्या 'कॉफी टेबल बुक'मध्ये त्याचा वापर करता येईल.'' 

दरम्यान, पुणे पोलीस आयुक्तालयाच्या वतीने तयार केलेल्या 'लोक भावनांचे सर्वेक्षण' या पुस्तिकेचे प्रकाशन देशमुख यांच्या हस्ते झाले. संबंधीत सर्वेक्षणानुसार, 83% लोकांनी पुणे शहर पोलिसांनी केलेल्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले आहे.

तसेच पोलिसांच्या पाल्यांसाठीच्या शालेय ऑनलाईन प्रशिक्षणासाठी तांत्रिक सहाय्य कारणाऱ्या बिझनेस बायजू एज्युकेशन टेक्‍नॉलॉजी कंपनीचे सहायक उपाध्यक्ष अरुणेश कुमार, पोलीस उपाआयुक्त बच्चन सिंग यांच्या नेतृत्वाखाली सुरू केलेल्या 'डिजीटल पास' ही कार्यप्रणाली विकसित करणाऱ्या 'सायबेज सॉफ्टवेअर'चे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण नथानी यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.

पोलिसांकडून स्थलांतरीत व गरजूंना भोजनाचे व अन्नधान्याचे किट देणे, प्रवासाच्या परवानगीचे पासेस देणे, वाहनांची सुविधा देणे यांसारख्या कामांची माहिती देशमुख यांना देण्यात आली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder 5 KG पाच किलो एलपीजी सिलिंडरबाबत नवा नियम, खरेदीसाठी ओळखपत्र बंधनकारक

बारामतीत काँग्रेसनं उमेदवारी दिलेले आकाश मोरे कोण? अजित पवारांच्या विरोधात डिपॉझिट झालेलं जप्त

RCB vs CSK: अरे काय केलं... विराट कोहलीचा शिवम दुबेने एकदम सोपा कॅच सोडला; अनुष्का शर्माही शॉक; Video Viral

अल्पवयीन बहिणींच्या लग्नाचा घाट, पोलिसांसह अधिकाऱ्यांनी रोखला बालविवाह

IPL 2026: १९ षटकार... टीम डेव्हिडची वादळी फटकेबाजी, पडिक्कलचीही फिफ्टीच; CSK विरुद्ध RCB च्या अडीचशे धावा पार

SCROLL FOR NEXT