Untitled-4.jpg 
पुणे

एल्गार आणि माओवादी संबंध प्रकरण वर्ग करण्यास राज्याचा विरोध

सकाळ वृत्तसेवा

पुणे : एल्गार आणि माओवादी संबंध प्रकरणाची कागदपत्रे आणि सुनावणी मुंबई येथील राष्ट्रीय तपास यंत्रणे (एनआयए) च्या न्यायालयात वर्ग करण्यास राज्याने अर्थात जिल्हा सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी देखील विरोध केला आहे.

एनआयएचे कलम 11 आणि 22 यांचा संदर्भ देत ऍड. पवार यांनी युक्तिवाद केला. कलम 22 नुसार राज्याला तपासाचे आदेश देण्याचे अधिकार आहेत. तर कलम 11 मध्ये याबाबतचे अधिकार केंद्राला आहेत.

एनआयएकडे तपास गेल्याने त्याची सुनावणी घेण्यासाठी पुण्यात देखील न्यायालय आहे. याबाबत गुरुवारी देण्यात आलेले विविध निकालाचे संदर्भ या प्रकरणात लागू होत नाही, असे ऍड. पवार यांनी न्यायालयात सांगितले.

एनआयएने न्यायालयात दाखल केलेल्या अर्जावर निर्णय देण्याचे अधिकार सध्या सूनावणी सुरू असलेल्या न्यायालयास नाही, असा युक्तिवाद बचाव पक्षाच्यावतीने गुरुवारी करण्यात आला. एनआयए व बचाव पक्षाने केलेला युक्तिवाद आणि सादर केलेल्या विविध न्यायालयांच्या निकालावर उत्तर देण्यासाठी सरकार पक्षाने एक दिवसाचा वेळ मागितला होता. त्यानुसार आज सरकार पक्षाने म्हणजे सादर केले.

एनआयएने केलेला अर्ज कायदेशीरदृष्ट्या चुकीचा आहे. एनआयएने कायदेशीर कारण दिलेले नाही. गुन्ह्याचा तपास झाला असून या न्यायालयाला सुनावणी घेण्याचे अधिकार आहेत. आतापर्यंत दोन दोषारोपपत्र देखील दाखल झाले आहेत. आरोप निश्चितीची वेळ असताना तपास वर्ग करण्याची मागणी चुकीची आहे, असे सरकार पक्षाने सादर केलेल्या म्हणण्यामध्ये नमूद आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Political Links : भोंदू अशोक खरात प्रकरणात नवे खुलासे; ४०-४५ राजकीय नेत्यांची नावे मोबाईल क्लोन डेटातून उघड

नालंदा हादरलं! शीतला माता मंदिरात दर्शनासाठी उसळली गर्दी; चेंगराचेंगरीत आठ भाविकांचा दुर्दैवी मृत्यू

Hormuz Strait: होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाण्यासाठी किती द्यावा लागणार टोल? इराणने लागू केले नियम; कोणत्या जहाजांवर बंदी आहे?

Pune Property: पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात घरांच्या किमती वाढणार?; रेडीरेकनरच्या दरात ८ ते १० टक्के वाढ प्रस्तावित!

Mhada House: म्हाडाची घरे खरंच परवडणारी? मुंबईतील घरांच्या किमती एक काेटीच्या पुढे

SCROLL FOR NEXT