Sugar_Commissioner
Sugar_Commissioner 
पुणे

साखर आयुक्तांनी गाठली ऊसतोड कामगारांची छावणी; मुलांशी केली 'मन की बात'!

सकाळ वृत्तसेवा

राहू (पुणे) : राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड, जिल्हा परिषदचे मुख्यकार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय मुंढे, सहसंचालक पांडुरंग शेळके यांनी श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्यास अनपेक्षितपणे भेट दिली. आणि कोरोना कलावधीत कारखान्यावर ऊसतोड कामगार आणि कर्मचारी यांची कशा प्रकारे काळजी घेतली जात आहे, याची पाहणी केली.

ऊसतोड मजुरांकरिता शौचालय, पिण्याचे फिल्टर पाणी, वापरायचे पाणी, ठिकठिकाणी हात धुण्करिता पाण्याची सोय, मास्क, सॅनिटायझर वाटप, थर्मल स्क्यानिंग, सोशल डिसटन्स नियमांचे पालनानुसार कोप्या बसवलेल्या आदी सोयी सुविधा पाहावयास मिळाल्या. 

ऊसतोडणी बांधवांचा विमा उतरवणे, बैलांचा विमा, वाहनांना रिफ्लेक्टर, रुग्ण वाहिकेची सोय आदी सुविधांची पाहणी करण्यात आली. त्याबद्दल समाधान व्यक्त केले. भविष्यात ऊस तोडणी बांधवांकरिता कोप्यां ऐवजी पक्की घरे कारखाना व कारखाना कार्यक्षेत्रात उभारणी करता येईल या करिता कारखाना, शासन व जिल्हा परिषद यांचे मार्फत कशा प्रकारे योजनांं राबवता येईल याबाबत चर्चा झाली. कारखान्यावर साखर शाळा आहे. कारखाना कार्यक्षेत्रात बाहेर राहून काम करणारे ऊस तोडणी बांधवांची मुले शिक्षणाकरिता कारखाना व जिल्हा परिषदेने कार्यवाही करावी या बाबत चर्चा झाली.

साखर आयुक्त गायकवाड म्हणाले, काही निवडक चांगल्या कारखान्यांपैकी श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखाना आहे. आपला कारखाना नेहमीच सामाजिक बांधिलकी जपत आहे. कारखाना ते थेट ग्राहक साखर विक्री केंद्र शिक्रापूर येथे राज्यात पहिले सुरू करण्यात आले. पूर्वीचा व आत्ताचा साखर उद्योग यामध्ये खूप बदल झालेला आहे. साखर कारखान्यांनी मल्टीप्लेक्स थिएटर सारखे बदलणे आवश्यक आहे. हा बदल या कारखान्यात पहावयास मिळत आहे.

कारखान्याचे अध्यक्ष पांडुरंग राऊत म्हणाले की, सुरवातीला जुन्या मशीनरी मधून 1250 TCD चा कारखाना उभारणी केला व काळानुरूप बदल करत आज 4500 TCD कारखाना 10 मे वॅट कोजनरेशन, डिस्टिलरी प्रकल्प उभारणी केलेला आहे. कारखान्याने नेहमी शेतकरी हिताचा विचार केला आहे. सामाजिक उपक्रम राबवले जताता. भारतातील पहिला उपक्रम कारखाना ते ग्राहक साखर विक्री केंद्र कारखान्याने सुरू केला. भविष्यात पक्की घरे व इतर योजना कारखान्या मार्फत राबवल्या जातील अशी ग्वाही दिली.

जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद म्हणाले,  पुणे हे विद्येचे माहेरघर आहे त्याच प्रमाणे साखर कारखान्याच्या माधमातून ऊसापासून साखर व त्यापासून वीज निर्मिती व इथेनॉल निर्मितीमुळे पुणे ऊर्जेचे माहेरघरही होत चालले आहे. मान्यवरचे स्वागत कारखान्याचे संचालक श अनिल भूजबळ यांनी केले व आभार कारखान्याचे सरव्यवस्थापक  प्रकाश मते यांनी मानले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited By: Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Hatkanangale: निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजू शेट्टींना चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

SCROLL FOR NEXT