gar.jpg 
पुणे

कच-याच्या दुर्गंधीने कोथरुडच्या परिसरातील नागरीक हैराण

सकाळवृत्तसेवा

कोथरुड : सुतारद-यातील  रस्त्यावर पडलेला कचरा कुजल्याने दुर्गंधी पसरली आहे. त्याचा त्रास परिसरातील  नागरीकांना होत आहे. कच-याचे योग्य नियोजन करून दुर्गंधीच्या त्रासातून मुक्तता करावी अशी  मागणी सिल्व्हर क्रेस्ट सोसायटीतील रहीवाशांनी केली आहे.

सोसायटीच्या कंपाऊंड वॉल मागे कचरा टाकला जात असल्याने आम्हाला दुर्गंधीचा त्रास होत आहे. आमच्या गॅलरीच्या खिडक्या, दरवाजे बंद ठेवले तरी वास येतोय.  आमच्या सुरक्षेच्या व आरोग्याच्या दृष्टीने अपायकारक बाबीवर महापालिकेने तातडीने उपाय योजना करावी अशी आमची मागणी असल्याचे सिल्व्हर क्रेस्ट सोसायटीतील रहीवाशांनी सांगितले.

महापालिकेने पावसाळापूर्व नाले सफाई केली नसल्याने सुतारदरा येथील नाल्यात मोठ्या प्रमाणात घाण तशीच आहे. पेठकर साम्राज्य सोसायटीच्या नाल्यामध्ये पडलेली एक दुचाकी गेले आठ महिने तशीच पडून आहे. त्यामुळे नाल्याचा प्रवाह अडला आहे. सुतारदरा परिसरात मोठ्या प्रमाणात राडारोडा टाकला जात असून अनाधिकृत बांधकामावर पण कोणाचेही नियंत्रण राहीलेले नाही.

संदीप कुंबरे म्हणाले की, सुतारदरा मुख्य रस्त्यावरच मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जातो. त्यामुळे येथून येणारा जाणारांनाही दुर्गंधीचा त्रास होतो. महापालिकेचे कंत्राटी कामगार सफाई करतात पण कच-याचे प्रमाण एवढे आहे की बरेचदा ते त्यांच्या आवाक्याबाहेर जाते. सुतारदरा परिसरात कचरा संकलन व वर्गीकरणाचे व्यवस्थित नियोजन करण्याची गरज आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आरोग्य निरीक्षक संतोष ताटकर म्हणाले की, सध्या मी स्वतः क्वारंटाईन आहे. कंटेनरमुक्त प्रभाग करण्याचे धोरण असल्याने येथे कचरा कुंडी नाही. लोकांनी रस्त्यावर कचरा टाकू नये म्हणून संध्याकाळी दहा वाजेपर्यंत येथे कामगार असतो परंतु रात्री उशीरा येवून लोक कचरा फेकतात. कोरोनामुळे स्वच्छच्या कामगारांची संख्याही कमी झाली आहे. डुकरांचा बंदोबस्त करण्याबाबत महापालिकेच्या मुख्य कार्यालयात कळवले आहे.

(Edited by :Sagar Diliprao Shelar)
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG, Video: वैभव सूर्यवंशीची दोन सिक्ससह दणक्यात सुरुवात, पण मग कशी पडली विकेट? माघारी जाताना झाला भावूक

तुम्हीच सांगा उपवास कसा करायचा? सणासुदीच्या काळात भगरीच्या किंमतीत दुप्पटीने वाढ, साबुदाणाही महागला, पण किती?

Nagpur RTO Crackdown: नागपूरमध्ये HSRP नसलेल्या वाहनांवर RTOची धडक कारवाई; तीन दिवसांत १७२ वाहनांवर ई-चलान, १.७२ लाखांचा दंड

Melghat Teachers Scam: मेळघाटातील कंत्राटी शिक्षक भरतीत मोठा घोळ? आरटीई व संचमान्यतेला हरताळ, प्रहार संघटनेचा पारदर्शक प्रक्रियेचा आग्रह

Nagpur Education : मनपाच्या नव्या इंग्रजी शाळा अजूनही कागदावरच; आठवडा उलटला तरी प्रवेशप्रक्रिया ठप्प, पालक संभ्रमात

SCROLL FOR NEXT