Pune News  esakal
पुणे

Pune News : कंत्राटदारांची अडवणूक थांबवा, अन्यथा न्यायालयात जाण्याचा पर्याय खुला

पुणे कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनसह कंत्राटदार महासंघाचा इशारा

सकाळ डिजिटल टीम

पुणे : राज्य सरकारच्या अध्यादेशानुसार कामे सोडत पद्धतीने पूर्वीप्रमाणे मिळावीत. सार्वजनिक बांधकाम विभागात कंत्राट देण्याचे नियम डावलून प्रशासन आणि वजनदार लोकप्रतिनिधींकडून दडपशाही केली जात आहे. त्याचा फटका सर्वसामान्य कंत्राटदारांना बसत आहे. कंत्राटदारांची अडवणूक थांबवा, अन्यथा न्यायालयात जाण्याचा पर्याय खुला असल्याचा इशारा पुणे कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशन आणि पुणे जिल्हा कंत्राटदार महासंघाच्यावतीने देण्यात आला.

सार्वजनिक बांधकाम विभागातील अनागोंदी कारभारामुळे सुशिक्षित बेरोजगार अभियंता आणि शासकीय कंत्राटदारांवर होणाऱ्या अन्यायाच्या निषेधार्थ संघटनेच्यावतीने बुधवारी (ता. १०) आत्मक्लेष आंदोलन करण्यात आले. संघटनेचे अध्यक्ष रवींद्र भोसले, विश्वास थेऊरकर, सागर ठाकर, उदय साळवे, भालचंद्र होलसुरे, दिग्विजय निंबाळकर, बिपिन दंताळ, राहुल जगताप, अभिजित कांचन, केतन चव्हाण, तुषार पुस्तके, शैलेश खैरे, अभिमन्यू पवार, संजय काळे, अतुल मारणे यांच्यासह सुमारे दीडशे कंत्राटदारांनी आंदोलनात सहभाग घेतला.

रवींद्र भोसले म्हणाले, ‘‘सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे सर्वच विकासकामांसाठी नियम डावलून सरसकट निविदा प्रक्रिया राबविली जात असून, ती तातडीने थांबवावी. ठराविक कंत्राटदारांनाच काम दिले जात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सुमारे सात हजारांहून जास्त सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना कामापासून वंचित राहावे लागत आहे.’’ कार्यकारी अभियंते १० लाख रुपये खर्चापर्यंतची विकासकामे सोडत पद्धतीने देण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. ॲड. असीम सरोदे यांनी आंदोलन स्थळी जाऊन आंदोलनाला पाठिंबा दिला. ते म्हणाले, ‘‘प्रशासन आणि आमदार यांच्या भ्रष्ट युतीमुळे कंत्राटदारांवर अन्याय होत आहे. याबाबत न्यायालयातही दाद मागता येऊ शकेल. तसे झाल्यास भ्रष्टाचारात गुंतलेले सर्वच जण उघडे पडतील.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बिहार मतदानापूर्वी राहुल गांधींचा 'हायड्रोजन बॉम्ब', केंद्राने कसं मॅनेज केलं, धक्कादायक आरोप अन् पुरावे एका क्लिकवर

Uddhav Thackeray In Beed : ''फडणवीस दगाबाज, सत्तेबाहेर करणं हाच पर्याय''; ठाकरेंचा शेतकऱ्यांशी संवाद, बच्चू कडूंच्या आंदोलनावरही बोलले...

Solapur Crime: 'साेलारपुरात महिला डॉक्टरचा रुग्णाकडून विनयभंग'; न्यायालयाने सुनावली १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी..

कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका घेणार निरोप? अभिनेत्रीच्या पोस्टची रंगली चर्चा; म्हणाली- शेवटचा दिवस....

Pune Railway Station : दिवाळीत ३५ लाख नागरिकांचा रेल्वे प्रवास; पुण्यातून धावल्या नियमित अन्‌ विशेष ११०० गाड्या

SCROLL FOR NEXT