peth.jpg 
पुणे

पेठमध्ये कडकडीत बंद

जयदीप हिरवे

सातगाव पठार (पुणे) : पेठ (ता. आंबेगाव) येथे कोरोनाबाधित रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शुक्रवार (ता. 11) अखेर पेठमध्ये एकूण 41 कोरोनाबाधित रूग्ण सापडले असून यातील 18 रूग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. एका रूग्णाचा मृत्यू झाला असून सध्या 22 रूग्ण उपचार घेत आहेत. दिवसेंदिवस रूग्ण सापडत असल्याने पेठ गाव 5 दिवसांसाठी बंद ठेवण्यात आले होते यास नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सातगाव पठार भागातील मुख्य बाजारपेठ पेठ हे गाव आहे. त्यामुळे पेठ गावाशी परिसरातील सर्व गावांतील नागरिकांचा रोजचाच संपर्क येत असतो. त्यातच परिसरातील पारगाव तर्फे खेड, कारेगाव, भावडी, थुगाव आदी गावांत देखील कोरोनाबाधीत रूग्ण आढळत आहेत. त्यामुळे कारोनाबाधितांची साखळी तोडण्यासाठी पेठ गाव मंगळवारपासून सलग पाच दिवस अत्यावश्यक सेवा वगळता बंद ठेवण्यात आले होते. यास सर्व नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. 

वाढत असलेल्या रूग्णांच्या पार्श्वभुमीवर सध्या पितृ पंधरवडा असल्याने नागरिकांनी एकमेकांच्या घरी फारसे येऊ जाऊ नये. प्रत्येक नागरिकांनी पुढाकार घेऊन काळजी घेतली घ्यावी. प्रत्येक नागरीकांनी  आपल्या घरी सॅनिटायझरचा वापर करावा. अशा प्रकारच्या खबरदारीच्या सूचना पेठ गावचे माजी उपसरपंच अनिल सणस यांनी दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर ! 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट, जाणून घ्या आज तुमच्या भागात कसे असेल हवामान?

ढिंग टांग : ‘हम्म्मऽऽ’...चा हुंकार!

मानसवेध : तमसो मा ज्योतिर्गमय

विशेष : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भविष्यातील निर्णय

Poha-Rava-Curd Pancake: पोहे नेहमीच बनवता? एकदा करून पाहा पोहे-रवा दही पॅनकेक; चवीला कुरकुरीत, आतून मऊ!

SCROLL FOR NEXT