Student Cancelled Mahaportal Exam due to Electricity Cutting at Marunji 
पुणे

म्हणून महापोर्टलच्या परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांनी घातला गोंधळ

सकाळ वृत्तसेवा

हिंजवडी : खंडित वीज पुरवठ्यामुळे संगणक बंद असल्याने महापोर्टलच्या परीक्षेदरम्यान विदयार्थ्यांनी गोंधळ घालत परीक्षा बंद पाडली. हा प्रकार मारुजी येथील आलार्ड कॉलेजमध्ये घडला. या कॉलेजमध्ये स्टेट बोर्डाच्यावतीने घेण्यात आलेल्या कनिष्ठ लिपिक पदाची ऑनलाईन परीक्षा सुरू होती.  

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप 

सकाळी 11 वाजता ऑनलाईन पेपर सुरू होताच, विजेचा लपंडाव सुरू झाला आणि संगणक बंद पडू लागले. पुन्हा वीजपुरवठा सुरू झाल्यानंतर इंटरनेट लोड होण्यास विलंब होत असल्याने परीक्षार्थी चिडले व परीक्षा नियंत्रकाकडे गेले. वारंवार संगणक बंद पडू लागल्याने विद्यार्थ्यांनी गोंधळ घालत परीक्षा बंद पाडली. अखेर हा गोंधळ व जमावाला शांत करण्यासाठी पोलिसांना पाचारण करावे लागले.

Video: पोलिसांनी दंड केल्यावर भररस्त्यात ढसाढसा रडला...

अखेर हिंजवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती आटोक्यात आणली. आजची परीक्षा रद्द करून पुन्हा नव्याने तारीख निश्चित करण्यात येईल असा निर्णय प्रशासनाने घेतला व त्याबाबतची नोटिस प्रवेशद्वारवर लावली असल्याचे पोलीस निरीक्षक यशवंत गवारी यांनी सांगितले . 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT