student preparing for MPSC exam Protest by sleeping on street Against traffic police video goes viral  
पुणे

अधिकारी होणार भावा! पुण्यात 'MPSC'च्या विद्यार्थाचा वाहतूक पोलिसाला हिसका, Viral Video पाहाच

सकाळ डिजिटल टीम

पुणे: गावी जाण्यासाठी दुचाकीवरुन पुणे स्टेशन येथे जाणाऱ्या तरुणाला अडवून त्याच्याकडे दंडाची रक्कम भरण्यासाठी वाहतुक पोलिसांनी अडवणूक केली. तरुणाने रेल्वेचे तिकीट दाखवून गावी जाण्याचे कारण सांगत, ऑनलाईन पैसे भरण्याची विनवणी करुनही पोलिसांनी ऐकले नाही. अखेर, पोलिसांच्या अडेलतट्टुपणामुळे तरुणाच्या रेल्वेची वेळ निघून गेल्याने, तरुणाने भर चौकात झोपून अभ्यास करीत पोलिसांचा अनोख्या पद्धतीने निषेध नोंदविला. पाऊणतास चाललेल्या या नाट्यानंतर उपरती झालेल्या पोलिसांनी त्यास आम्ही तुला गावाला पाठवितो, असे सांगत आंदोलन मागे घेण्यास सांगितले.

शहरातील वाहतुक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असताना, वाहतुक पोलिस मात्र अजूनही चौकाचौकात थांबून वाहनचालकांना अडवून, त्यांच्या पावत्या फाडण्यातच मश्‍गुल असल्याचे चित्र पुन्हा दिसू लागले आहे. सोमवारी दुपारी मात्र पोलिसांच्या कारवाईचा एका स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणाला चांगलाच फटका बसला.

सोमवारी ( ता. 17) दुपारी तीन वाजता यवतमाळ येथे राहणारा व सध्या पुण्यात स्पर्धा परिक्षेची तयारी करणारा राहुल धांडे हा विद्यार्थी दुपारी सव्वा तीन वाजता रेल्वे असल्याने गावी जाण्यासाठी मित्राच्या दुचाकीवरुन जात होता. त्यांची दुचाकी टिळक चौकात आली, तेव्हा वाहतुक पोलिसांनी त्यांची दुचाकीवर असलेला पाठीमागील दंड भरण्यास सांगितले. त्यावेळी "माझ्याकडे सध्या पैसे नाहीत, मी चार महिन्यांनंतर गावी आई-वडीलांकडे जात आहे. मी ऑनलाईन दंड भरतो'' अशी राहुलने पोलिसांना विनवणी केली. पण पोलिसांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले.

पोलिसांबरोबर बराच वेळ हुज्जत घातल्यानंतर राहूलची रेल्वेची वेळ गेली. त्यामुळे त्रस्त होऊन त्याने थेट रस्त्यावरच झोपून, अभ्यास करीत आंदोलन सुरु केले. त्याची चर्चा सुरु झाल्यामुळे अखेर पाऊण तासाने पोलिसांनी त्यास "आम्ही तुझी गावी जाण्याची व्यवस्था करतो" असे सांगत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

"मला गावी जायचे असल्याने मी पोलिसांना विनवणी केली, परंतु त्यांनी मला सोडले नाही. याऊलट त्यांनी कारमधील व्यक्तींना विमानतळावर जायचे असल्याने तसेच त्यांनी एका पोलिस अधिकाऱ्याला फोन लावल्याने त्यांना सोडले. हा दुजाभव सहन न झाल्यामुळे आपण हे आंदोलन केले.''-राहुल धांडे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satana News : दुष्काळ जाहीर; मात्र शेतकरी डिजिटल चक्रव्यूहात, सातबारा अन् ‘फार्मर आयडी’साठी संकेतस्थळे ठप्प

SME Growth Fund : लघु आणि मध्यम उद्योगांसाठी १० हजार कोटींचा 'एसएमई ग्रोथ फंड'; केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

Marathi News Live Updates: पुनर्विकासाचे सर्वाधिक प्रकल्प कोथरूडमध्ये ‘द रीडेव्हलपमेंट पल्स’चा अहवाल

Sanchar Saathi Milestone : सायबर फसवणुकीविरोधात नागरिक बनले ‘योद्धा’! ‘संचार साथी’ पोर्टलने ओलांडला ३० कोटी भेटींचा टप्पा

Mumbai Police: 2 हजार 850 बनावट अ‍ॅप्स अन् 9 हजार 673 नागरिकांची 150 कोटींची फसवणूक; मुंबई पोलिसांनी केला पर्दाफाश

SCROLL FOR NEXT