Student Tiffin Delivery volunteers are Interrupted by police in pune.png 
पुणे

Corona Virus : विद्यार्थांना डब्बे पोहचविणाऱ्या अन्नदात्तांची होतेय पोलिसांकडून अडवणूक

सकाळवृत्तसेवा

पुणे : राज्य सरकारने राज्यात संचारबंदी लागू केल्याने सर्वत्र पोलीस बंदोबस्त आहे मात्र यामुळे परगावाहून पुण्यात आलेल्या विद्यार्थ्यांना जेवणाचे डबे देणे देण्यात अडचणी निर्माण झाले आहे. जागोजागी पोलिस असल्याने जेवण पोहोचवणाऱ्या स्वयंसेवकांची अडवणूक केली जात आहे.

राज्यात संचारबंदी ; जिल्ह्यांच्या सीमाही बंद
 
पुण्यात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना जेवणाची अडचण होऊ नये यासाठी अनेक संस्था संघटना पुढे आल्या आहेत. ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून अन्नदानाचे कार्य करत आहेत. परंतु संचारबंदीमुळे विद्यार्थ्यांपर्यंत अन्न पोहोचवणे कठीण झाले आहे. डबे पोहोचविणाऱ्या संघटनांच्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून अडवले जात आहे, अशी तक्रार संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. दत्तवाडी परिसरात हा प्रकार घडल्याचे त्यांनी सांगितले.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

गेले काही दिवसांपासून राज्य सरकारने कोणाचा संसर्ग रोखण्यासाठी पावले उचलली आहे. त्यामुळे शहरातील हॉटेल खानावळी बंद करण्यात आल्या आहेत. परिणामी विद्यार्थ्यांना आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या तरुणांना जेवण मिळणे दुरापास्त झाले आहे. यातूनही मार्ग काढा संस्था संघटना आणि राजकीय पक्ष यांनी डबे देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. मात्र संचारबंदीच्या नावाखाली विद्यार्थ्यांना डबे पोहोचविण्यापासून अडवले जात असल्याने विद्यार्थ्यांची अडचण कशी दूर करायची हा प्रश्न या कार्यकर्त्यांना पडला आहे. 

याप्रश्नी काल पोलिस यंत्रणेला माध्यमांनी विचारणा केली होती त्यावर अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय शिंदे यांच्याकडून अन्नदाता म्हणजेच विद्यार्थ्यांना डबे पोचविणारे स्वयंसेवक तसेच रुग्णसेवक आणि केअरटेकर यांची संचारबंदीच्या काळामध्ये अडवणूक केली जाणार नाही अशी ग्वाही देण्यात आली होती. मात्र, त्याप्रमाणे रस्त्यावर बंदोबस्तासाठी असलेले पोलिस कृती करत नसल्याचे चित्र आहे. यातून विद्यार्थ्यांची गैरसोय होण्याबरोबरच पोलिसांमध्ये पोलिसांच्याबाबत नागरिकांमध्ये राग पसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकाराची दखल घ्यावी, अशी मागणी कार्यकर्त्यांकडून आणि स्वयंसेवकांकडून होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ahilyanagar Ganesh Visarjan : अहिल्यानगरमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीत लाठीचार्ज; तरुणाचा मृत्यू, आमदार संग्राम जगताप यांचे ठिय्या आंदोलन

आजचे पंचांग 24 सप्टेंबर 2026! प्रदोषामुळे खास दिवस; वाचा शुभ मुहूर्त आणि राहुकाळ

Jharkhand Dhuska Recipe: एकदा खाल तर पोहे-उपमाही विसराल! असा बनवा बाहेरून कुरकुरीत, आतून मऊ झारखंडी धुस्का

आजचे राशिभविष्य - 24 सप्टेंबर 2026

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 24 सप्टेंबर 2026

SCROLL FOR NEXT