पुणे : गेल्या पाच महिन्यांपासून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील वसतीगृहांना टाळे लागलेले असल्याने सध्या तेथे ऊंदरांचेच राज्य आहे. वसतीगृहातील साहित्य घेऊन जाण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्याला त्याच्या कपाटात कुरतडलेल्या कपड्यांच्या चिंध्या आणि पुस्तकांच्या पानांचे तुकडेच हाती लागले असल्याचा प्रकार समोर आला आहे. हा अनुभव आला आहे सिफ शेख या विद्यार्थ्याला.
धरणाचे पाणी आम्हाला मिळत नाही, मग आम्ही जमिनी का द्यायच्या? शेतकऱ्यांचा शासनाला...
आसिफ शेख हा स्कील डेव्हलमेंट विभागात द्वितीय वर्षात शिकत आहे. तो आठ नंबर वसतीगृहात रहायला आहे. त्याच्यासोबत आणखी तीन मित्र या खोलीत रहातात.
"कोरोना'मुळे विद्यार्थ्यांना आचानक वसतीगृह सोडून गावाकडे जावे लागले होते. दोन तीन आवठवड्यांनी पुन्हा विद्यापीठात रहायला यावे लागेल यासाठी बहुतांश साहित्य विद्यार्थी वसतीगृहातच सोडून गेले. त्यामध्ये कपडे, पुस्तके, लॅपटॉप, नोट्स, शैक्षणिक कागदपत्रे याचा समावेश होता. "कोरोना'चा प्रभाव वाढत असल्याने लॉकडाऊनही लांबत गेला. आता पाच-सहा महिने झाले तरी आणखी किती महिने विद्यार्थी वसतीगृहात परत येऊ शकणार नाहीत हे माहिती नाही. त्यामुळे वसतीगृहातील साहित्य घेऊन जाण्यासाठी विद्यार्थ्यांना विद्यापीठाने व्यवस्था उभी केली आहे. गेल्या काही आठवड्यापासून सुमारे 400 विद्यार्थी साहित्य घेऊन गेले आहेत.
- गणेशोत्सवात 'या' चार दिवशी ध्वनीवर्धक रात्री बारापर्यंत सुरू राहणार; पुणे पोलिसांनी केले जाहीर!
आसिफ हा गेल्या आठवड्यात त्याचे साहित्य घेण्यासाठी विद्यापीठात गेला होता. त्याने कपाट उघडले असता त्यावेळी त्याला कपडे, पुस्तके उंदाराने कुरतुडून मोठे नुकसान केल्याचे दिसले. सुदैवाने त्याची इयत्ता 10वी पासूनच्या गुणपत्रीका व इतर कागपदत्रांना जास्त नुकसान झाले नाही. पुणे विद्यापीठाच्या वसतीगृहांमध्ये ढेकुन, ऊंदीर मोठ्या प्रमाणात आहेत. विद्यार्थी असताना खोल्यांमध्ये पेस्टकंट्रोल केले जाते होते. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून खोल्या बंद असल्याने हा प्रकार घडला आहे.
"सकाळ'शी बोलतान आसिफ म्हणाला, ""माझ्या कपाटात पुस्तके, कपडे, कागपदत्र आणि सुकामेवा होता. ज्यावेळी कपाट उघडले तेव्हा सगळ्या चिंध्याच बाहेर आल्या. माझ्यासोबत रहाणाऱ्या माझ्या मित्रांचेही नुकसान झाले आहे. ग्रंथालयातून आणलेली पुस्तके खराब झाल्याने त्याचा भूर्दंड मला बसणार आहे. बाकीच्या खोल्यांमध्ये काय झाले आहे याची कल्पना मला नाही.''
पुणे विद्यापीठाचे वसतीगृह अधिक्षक सचिन बल्लाळ म्हणाले, ""लॉकडाऊनमुळे वसतीगृहातील खोल्यांना कुलूप आहे. आतमध्ये कोणी जाऊ शकत नाही. त्यामुळे बाहेरच्या बाजूने पेस्टकंट्रोल करण्यात आलेले होते. सुमारे 400 विद्यार्थ्यांनी साहित्य घेऊन गेले आहेत, ही एकमेव तक्रार आली आहे.''
"अचानक जाहीर झालेल्या लॉकडाऊनमुळे विद्यार्थ्यांनी खोल्यांना कुलूप लावून वसतीगृह सोडले होते. त्यामुळे खोल्यांमध्ये पेस्ट कंट्रोल करण्यावर मर्यादा येत आहेत. विद्यापीठाकडून प्रतिबंध उपाय योजना केल्या जात आहेत.''
डॉ. प्रफुल्ल पवार, कुलसचिव, पुणे विद्यापीठ
वसतीगृह संख्या - 18
मुलांचे - 9
मुलींचे - 9
क्षमता 2850
साहित्य घेऊन गेलेले विद्याथी - सुमारे 400
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.