unv.jpg 
पुणे

पुणे विद्यापीठाचा विद्यार्थ्यांना दिलासा; महाविद्यालयांना दिला 'हा' आदेश

सकाळवृत्तसेवा

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमध्ये विद्यार्थांनी एक रकमी शुल्क भरण्यासाठी तगादा लावू नये. दोन ते तीन हप्त्यात शुल्क भरण्यासाठी मुभा द्यावी असे आदेश विद्यापीठाने संलग्न महाविद्यालयांना दिले आहेत. 

पुणे शहरातील महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना आॅनलाईन क्लास लावण्यापूर्वी संपूर्ण शुल्क जमा करा, अन्यथा प्रवेश मिळणार नाही असे आदेश दिले होते. 'सकाळ'ने याबाबत वृत्त प्रकाशित करून यास वाचा फोडली. त्यानंतर शिवसेनेने शुल्क दोन ते तीन हप्त्यात घ्यावे यासाठी महाविद्यालयांना अादेश द्यावेत असे अशी मागणी विद्यापीठासह उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे करत, आदेश न दिल्यास आंदोलन करण्याचा इशारा शहर उपप्रमुख किरण साळी यांनी दिला होता. 

या वृत्ताची दखल घेऊन पुणे विद्यापीठाने कार्यक्षेत्रातील सर्व महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थांना विद्यार्थ्यांकडून शैक्षणिक एक रकमी घेऊ नये, शुल्क भरण्यासाठी विद्यार्थ्यांना विविध पर्याय उपलब्ध करुन द्यावेत, असे आदेश दिले आहेत. कोरोना लॉकडाउनमुळे पालक, विद्यार्थ्यांची आर्थिक स्थिस्ती वाईट आहे. पालक आणि विद्यार्थ्यांना एक रकमी शैक्षणिक शुल्क भरणे शक्य नाही. सध्याची आर्थिक आणि सामाजिक स्थितीचा पाहता विद्यार्थ्यांना शुल्क भरण्याबाबत विविध पर्याय उपलब्ध करुन द्यावेत, असेही परिपत्रकात नमूद केले आहे.

येत्या काही दिवसांत महाविद्यालयांमधील प्रवेश प्रक्रिया सुरू होईल. या प्रवेश प्रक्रियेवर बरीक नजर ठेवून विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थ्यांवर कोणताही अन्याय होणार नाही, कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही, याची काळजी घ्यावी, अशी मागणी साळी यांनी केली आहे.

Editied by : sagar shelar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Israel War : 'भारतासाठी ही स्थिती चिंताजनक, युद्ध थांबले नाही तर देशावर त्याचे गंभीर परिणाम होणार'; PM नरेंद्र मोदी यांचा इशारा

Gold-Silver Price: सोने-चांदीच्या दरात मोठी उसळी; युद्धस्थिती शमल्याचा परिणाम

Latest Marathi News Live Update : रुपाली पाटील उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या भेटीला

Dhurandhar Movie Controversy: बॉक्स ऑफिसवर गाजणारा ‘धुरंधर’ आता कायद्याच्या रडारवर; बंदी घालण्याची मागणी

Accident In Kagal : नॅशनल हायवे बनला मृत्यूचा सापळा, रेल्वे भरतीची परीक्षा देऊन घरी येताना विवाहितेचा भीषण अपघात; दोन्ही मुले झाली आईविना पोरकी

SCROLL FOR NEXT