Scholarship
Scholarship 
पुणे

पदव्युत्तर उच्च शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘के. सी. महिंद्रा शिष्यवृत्ती’ 

सकाळन्यूजनेटवर्क

पुणे, ता. १४ : पदव्युत्तर उच्च शिक्षणासाठी परदेशी जाऊ इच्छिणाऱ्या जवळपास ५५ विद्यार्थ्यांना यंदा 'के. सी. महिंद्रा शिष्यवृत्ती' देण्यात येणार असल्याची घोषणा ‘के. सी. महिंद्राएज्युकेशन ट्रस्ट’तर्फे करण्यात आली आहे. तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांच्या मुलाखती ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहेत.

'के. सी. महिंद्रा एज्युकेशन ट्रस्ट'च्या या शिष्यवृत्तीसाठी यंदा एक हजार २४६ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. या विद्यार्थ्यांच्या अर्जाचे व्यवस्थित मूल्यांकन केल्यावर त्यातील ९० विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी निवडण्यात आले आहे. मुलाखती घेण्यासाठी नऊ सदस्यांची एक समिती नियुक्त करण्यात आली. 

आता 'या' राज्यात पुन्हा कडक लॉकडाऊन; सर्वच व्यवहार राहणार बंद
शिष्यवृत्ती योजनेबद्दल माहिती देताना महिंद्रा समुहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा म्हणाले, ‘’देशाच्या आर्थिक भवितव्याची उच्च शिक्षण ही गुरुकिल्ली आहे. या अनोख्या संधीचा उपयोग शिष्यवृत्तीधारक त्यांच्या शैक्षणिक उद्दिष्टांसठी करतील, एवढेच नव्हे तर ते समाजात सकारात्मक प्रभाव टाकतील, अशी मला खात्री आहे.’’
या अंतिम यादीतील उमेदवारांमध्ये भारतीय तंत्रज्ञान संस्थेमधील (आयआयटी) २३ पदवीधरांचा समावेश आहे. उर्वरीत उमेदवरबिट्स पिलानी, नॅशनल लॉ स्कूल, लेडी श्री रामकॉलेज, सेंट झेवियर्स कॉलेज, सेंट स्टीफन्स आणि सर जेजे कॉलेज ऑफ आर्किटेक्चर अशा प्रमुख शैक्षणिक संस्थांचे माजी विद्यार्थी आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 phase 4 Election Voting LIVE : लोकसभेच्या चौथ्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात; संभाजीनगर-वडगाव शेरीमध्ये नागरिक खोळंबले

High Court : माजी सहकारमंत्र्यांचा 'तो' आदेश न्यायालयाकडून रद्द; 'जय भवानी'च्या चौकशीचा मार्ग मोकळा

मतदार यादीतून तुमचे नाव वगळले आहे का? 2 कागदपत्रांसह ‘येथे’ फार्म नंबर-6 भरा, 7 दिवसात समाविष्ठ होईल नाव; लोकसभेला मतदार यादीत नाव नसल्याच्या तक्रारी

Sakal Podcast: महाराष्ट्रात आज ११ जागांसाठी मतदान ते महाराष्ट्रात आढळला कोरोनाचा नवा व्हेरियंट!

Latest Marathi News Live Update : प्रज्वलला आणण्यासाठी एसआयटी परदेशात जाणार नाही - गृहमंत्री परमेश्वर

SCROLL FOR NEXT