MPSC Exam sakal
पुणे

MPSC News : एमपीएससीच्या अंतर्गत राजकारणाचा विद्यार्थांना फटका, परीक्षा रखडल्याने उमेदवारांचा आरोप; वाचला १८ समस्यांचा पाढा

MPSC Latest News : वादग्रस्त सरळसेवा भरती, कोरोनाच्या टाळेबंदीत वाया गेलेली अडीच वर्षे आणि भरती प्रक्रियेतील भ्रष्टाचारामुळे स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी अक्षरशः हवालदिल झाले आहेत.

सम्राट कदम

पुणे, ता. ५ ः प्रतिनियुक्तीवर आलेल्या सचिव व सहसचिव यांच्यामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा (एमपीएससी) कारभार विस्कळित झाला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास होत असून, आयोगाचे अंतर्गत राजकारण यासाठी कारणीभूत असल्याचा आरोप उमेदवारांनी केला आहे. रखडलेल्या तब्बल १८ परीक्षांचा पाढाच उमेदवारांनी ‘सकाळ’कडे वाचला.

वादग्रस्त सरळसेवा भरती, कोरोनाच्या टाळेबंदीत वाया गेलेली अडीच वर्षे आणि भरती प्रक्रियेतील भ्रष्टाचारामुळे स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी अक्षरशः हवालदिल झाले आहेत. त्यात सर्वाधिक विश्वासार्ह असलेल्या एमपीएससीचाही कारभार विस्कळित झाला असून, घोषित होणारी प्रत्येक परीक्षा रखडत आहेत.

त्यामुळे पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी असलेले विद्यार्थी प्रचंड ताणतणावात आहे. धाराशिव हून पुण्यात अभ्यासाला आलेला सुधीर (नाव बदललेले) सांगतो, ‘‘राज्यसेवेच्या संयुक्त पूर्व परीक्षेची तारीख अजूनही घोषित झालेली नाही. मागील अनेक परीक्षांचे निकाल प्रलंबीत आहेत. दर महिन्याला मला सात ते १० हजार रूपये खर्च येत असून, पुण्यात राहावे का नाही. हाच मोठा प्रश्न आहे.’’ एमपीएससीला घटनात्मक स्वायत्तता असतानाही ते विद्यार्थी हिताचे काम का करत नाही, असाही प्रश्न काही उमेदवारांनी उपस्थित केला.

----------

प्रलंबित प्रश्न

१) पसंती क्रमांकाबाबत चुकीची प्रक्रिया

२) कर सहाय्यक पदाचा लावलेला चुकीचा निकाल

३) पीएसआयपदी अपात्र खेळाडूंची निवड

४) गट क लिपिक पदाचा निकाल आणि कौशल्य चाचणी रखडली

५) राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२४ ची सुधारित तारीख कधी घोषित होणार

६) संयुक्त पूर्व परीक्षा गट ब व गट क ची जाहिरात

७) पीएसआय (२०२२) मैदानी चाचणीची तारीख

८) खात्यांतर्गत पीएसआय पदाचा निकाल

९) ऑप्टिंग आऊटचे सुधारित धोरण

१०) वेळापत्रकाची अंमलबजावणी न होणे

११) निकाल प्रक्रियेतील विलंबाबाबत

१२) रखडलेल्या मुलाखतींची माहिती नाही

१३) प्रत्येक जाहिरात न्यायालयीन प्रक्रियेत अडकत असून, उमेदवारांचे नुकसान होत आहे

१४) रखडलेल्या परीक्षांबाबत अजून कोणतीही घोषणा नाही

१५) काही पदांचे एक ते दोन वर्षांपासून अभ्यासक्रम घोषित नाही

१६) पीएसआय २०२१ चा अंतिम निकाल लावला जात नाही

१७) प्रतिनियुक्तीवर आलेल्या अधिकाऱ्यांबाबत चुकीची माहिती

१८) कृषी सेवा राजपत्रित २०२२ अंतिम निकाल सहा महिन्यांपासून प्रलंबित

----------------------

पोलिस उपनिरीक्षक २०२० आणि २०२१ चा निकाल घोषित झाला आहे. मात्र, पीएसआय २०२२ आणि २३ ची भरती रखडली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाला जमते ते एमपीएससीला का जमत नाही. प्रत्येक वेळी विद्यार्थ्यांनी आंदोलन करायचे का?

- सुनीता (नाव बदलेले)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT