Educational Calendar 
पुणे

विद्यार्थ्यांना स्वयंअभ्यासाठी 'दिनदर्शिका'चे होणार सहाय्य

मीनाक्षी गुरव

पुणे - शाळेतील नियमित तासांप्रमाणे घरी बसूनही अभ्यास करता यावा, यासाठी विद्यार्थ्यांच्या मदतीला आता शैक्षणिक दिनदर्शिका असणार आहे. याद्वारे विद्यार्थ्यांना विषयानुसार पाठ्यपुस्तकातील प्रत्येक पाठाचा घरात राहून स्वयंअभ्यास करणे शक्य होणार आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दरवर्षीप्रमाणे यंदा नियमितपणे शाळा सुरू करणे शक्य झाले नाही. म्हणून राज्य सरकारमार्फत डिजीटल माध्यमातून शिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला. या पार्श्वभूमीवर परिषदेने इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक दिनदर्शिकेची निर्मिती केली आहे. या दिनदर्शिकेचा वापर शिक्षक, पालक यांनी अत्यंत विचारपूर्वक करून विद्यार्थ्यांचे शिकणे अधिक समृद्ध करणे आवश्यक असल्याची माहिती परिषदेतर्फे देण्यात आली आहे. प्रत्यक्ष शाळा सुरु होईपर्यंत विद्यार्थी या दिनदर्शिकेचा वापर करून आपल्या सवडीनुसार आणि वेळेनुसार शिक्षण घेऊ शकणार आहे.

ही शैक्षणिक दिनदर्शिका जून, जुलै आणि ऑगस्ट या महिन्यात पाठ्यपुस्तकातील पाठांनुसार अभ्यास कसा करावा, असे सांगणारी आहे. ही दिनदर्शिका पीडीएफ स्वरूपात परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. परंतु ही दिनदर्शिका विद्यार्थ्यांनी पालक आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली वापरायची असल्याची सूचना परिषदेतर्फे देण्यात आली आहे. या दिनदर्शिकेत पाठ शिकताना विद्यार्थ्यांनी काय करावे, अध्ययनासाठी कोणते स्रोत वापरायचे हेही सांगण्यात आले आहे.

विद्यार्थी- पालक यांच्यासाठी सूचना -
- ही दिनदर्शिका म्हणजे पाठ्यपुस्तकातील पाठांवर आधारित नियोजन
- अध्ययन करताना पाठ्यपुस्तकांचा उपयोग करावा
- एक पाठ संपल्यानंतर त्यावरील स्वाध्याय पुर्ण करावा
- दररोज प्रत्येक विषयाचा अभ्यास करण्याची सवय लावून घ्या
- ठराविक कालावधीनंतर शिक्षकांनी पाठविलेल्या चाचण्याही सोडवाव्यात
- ई-साहित्य सलगपणे न पाहता प्रत्येक विषय संपल्यानंतर थोडी विश्रांती घ्या

शिक्षकांसाठी सूचना -
- ही दिनदर्शिका आपल्या सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोचवावी
- याद्वारे अभ्यास कसा करावा, यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करा
- पाठ शिकताना पाठ्यपुस्तकांचा वापर कसा करायचा, याबद्दल शिक्षकांनी सूचना द्याव्यात
- ई-साहित्य संबंधित समांतर उपक्रम आणि स्वाध्याय याबाबत विद्यार्थ्यांशी संवाद साधावा
- प्रत्येक पाठाचे ई-साहित्य बघण्यापूर्वी आणि बघितल्यानंतर काय करावे, याबद्दल विद्यार्थ्यांना सांगावे

'कोरोनामुळे शाळा बंद असल्या तरी शिक्षण थांबू नये, यासाठी पाठ्यपुस्तकांच्या सहाय्याने विद्यार्थ्यांना स्वयंअभ्यास करण्यास सहाय्य करण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने पूरक शैक्षणिक दिनदर्शिका विकसित केली आहे.‬ ही दिनदर्शिका "‪http://bit.ly/2YTrzj5" या लिंकवर उपलब्ध असून प्रत्येक इयत्तेनुसार ती पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करता येणार आहे."
- विकास गरड, उपसंचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांच्या डिफेंडर गाडीची पोलिसांकडून कसून तपासणी; तपासणी करण्यामागचे कारण काय?

'लाल लाल कलरची बांगडी...'नऊवारी साडी अन् मराठमोळा लूक, शिल्पा शेट्टीचा डान्स पाहिलात का? Viral Video

QR स्कॅन करण्यापासून ते खात्यात पैसे जमा होण्यापर्यंत, UPI नेमकं कसं काम करतं? वाचा पडद्यामागची संपूर्ण कहाणी

Marathi News Live Updates : नागपुरात भरधाव कारचा भीषण अपघात, ७ जणांना उडवलं

Mumbai Ganeshotsav:लालबागच्या गर्दीवर रेल्वे पोलिसांचा वॉच: चिंचपोकळी, करी रोडवर २१९ आरपीएफ जवानांसह ५५ तिकीट तपासनीस

SCROLL FOR NEXT