Subhedar_Laxman_Doiphode
Subhedar_Laxman_Doiphode 
पुणे

इंदापूरच्या सुपुत्राला वीरमरण;आसाममध्ये सुभेदार लक्ष्मण डोईफोडे यांचा अपघाती मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

वालचंदनगर (पुणे) : बोराटवाडी (ता.इंदापूर) येथील सुभेदार लक्ष्मण सतू डोईफोडे यांना आसाममध्ये वीरमरण आल्याने इंदापूर तालुक्यावरती शोककळा पसरली. सुभेदार डोईफोडे हे भारतीय सैन्य दलात आसाममध्ये कार्यरत होते. मंगळवार (ता.२३) रोजी ड्युटीवरती असताना भारतीय जवानांची गाडी दरीमध्ये कोसळ्याने दोन जणांचा मृत्यू झाला. यामध्ये डोईफोडे यांचा समावेश आहे.

शेतकरी कुंटूबातील लक्ष्मण डोईफोडे हे २६ वर्षापासून भारतीय सैन्य दलामध्ये कार्यरत असून देशसेवा करीत आहेत. त्यांनी तीन वेळा सेवा वाढवून घेतली. ते दोन महिन्यांपूर्वीच बाेराटवाडी गावी सुट्टीसाठी आले होते. सुमारे २५ दिवस ते गावी होते. ड्युटीवरती जाताना गावातील सर्व नागरिकांना ते भेटून गेले होते. त्यांच्या पाठीमागे आई छबुताई, वडील सतू, पत्नी सरिता, मुलगा चेतन (२० वर्षे) आणि मुलगी वैष्णवी (१२ वर्षे) असा परिवार आहे. सुभेदार लक्ष्मण डोईफोडे यांच्या मृत्युमुळे इंदापूर तालुक्यावरती शोककळा पसरली आहे. शुक्रवार (ता.२६) रोजी त्यांचे पार्थिव बाेराटवाडी मूळ गावी आणण्यात येणार असून त्याच दिवशी अंत्यविधीही करण्यात येणार असल्याची माहिती जवळच्या नातेवाईकांनी दिली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sucharita Mohanti: काँग्रेसची दुर्दशा सुरूच! आणखी एका उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

घर का न घाट का... उन्मुक्त चंदच ड्रीम झालं उद्ध्वस्त! गुजराती खेळाडू बनला World Cupमध्ये अमेरिकन संघाचा कर्णधार

Pratik Gandhi : प्रतीक साकारतोय गांधी ; हॅरी पॉटर फेम 'या' अभिनेत्याची सिनेमात वर्णी

Reels Addiction : इन्स्टाग्राम अन् यूट्यूबचं कशामुळे लागतंय व्यसन? जाणून घ्या कसं काम करतं अल्गोरिदम..

Rishabh Pant: "ऋषभ पंतसोबत लग्न कर, तो तुला खुश ठेवेल..."; नेटकऱ्याची कमेंट, उर्वशीनं अवघ्या दोन शब्दात दिलं उत्तर

SCROLL FOR NEXT