पुणे

पाैड रस्त्यावरील भुयारी मार्ग अखेर खुले

समाधान काटे

मयुर कॉलनी : लॉकडाऊन होताच पौंड रस्त्यावरील भुयारी मार्ग बंद करण्यात आले होते. अनलॉकनंतर हे भुयारी मार्ग वापरासाठी खुले होणे अपेक्षित असताना खुले झाले नव्हते. नागरिकांच्या मागणीनुसार भुयारी मार्ग खुले करावे याबाबत दैनिक सकाळमध्ये बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, बातमीची दखल घेऊन महापालिका प्रशासनाने आज शुक्रवार ( ता.४ डिसेंबर) रोजी पौंड रस्त्यावर असलेले वनाज कॉर्नर येथील नानासाहेब धर्माधिकारी भुयारी मार्ग,जय भवानी चौकातील भुयारी मार्ग तसेच मोरे विद्यालय चौकातील शहिद भगतसिंग भुयारी मार्ग हे तिन्ही भुयारी मार्ग खुले केले आहेत.

मेट्रोचे काम सुरू असल्याने जेष्ठ नागरिकांना जीव मुठीत धरून रस्ता ओलांडून जावे लागत होते. रस्तावर काही ठिकाणी सिंग्नल देखील नसल्याने रस्ता ओलांडणे धोकादायक होत असे.शुक्रवार (ता. ४ डिसेंबर) पासून भुयारी मार्ग खुले करण्यात आले आहेत. भुयारी मार्ग खुले करावे याबाबत स्थानिक नागरिक राघवेंद्र निलेगांवकर, गिरीश गुरनानी, शंकर कानगुडे, मयुरेश मंचरकर या़नी प्रशासनाने मागणी केली होती.

नागरिकांच्या मागणीनुसार भुयारी मार्ग सुरू केले आहेत. स्वच्छता ठेवण्यात येईल. सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली आहे. नागरिकांनी त्याचा वापर करावा,जेणेकरून वाहतुकीस अडथळा होणार नाही व अपघात टळतील. -संदीप कदम, कोथरूड बावधन क्षेत्रीय अधिकारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT