esults 
पुणे

मुळशी तालुक्यात यंदाही मुलींचीच बाजी

बंडू दातीर

पौड (पुणे) ; महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा मुळशी तालुक्याचा निकाल 93.33 टक्के लागला आहे. गतवर्षीपेक्षा या वर्षी निकालात तब्बल बारा टक्क्यांनी भर पडली आहे. उत्तीर्णांमध्ये नेहमीप्रमाणेच मुलींनीच बाजी मारली आहे.

मुळशी तालुक्यात पौड, पिरंगुट, भूगाव, हिंजवडी, कासारआंबोली, ताथवडे, मारूंजी, भांबर्डे, उरवडे, बावधन, माण या अकरा ठिकाणी कला, वाणिज्य, विज्ञान शाखेचे बारावीचे वर्ग आहेत. तर, पौड व पिरंगुट येथे व्यवसाय अभ्यासक्रमाचे विविध अभ्यासक्रम शिकविले जातात. या सर्व शाळांमधून 1421 मुले आणि 1217 मुली, असे एकूण 2638 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 1308 मुले आणि 1154 मुली, असे एकूण 2462 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मुलांचे उत्तीर्णांचे प्रमाण 92.05 टक्के, तर मुलींचे प्रमाण तब्बल 94.82 टक्के आहे.

तालुक्यातील विविध शाळांचे निकाल पुढीलप्रमाणे : श्री छत्रपती शिवाजी विद्यालय पौड (कला- 83.33, वाणिज्य 100, व्यवसाय विभाग- 100), पिरंगुट इंग्लिश स्कूल (कला- 93.67, वाणिज्य- 98.27, विज्ञान- 97.17, व्यवसाय विभाग- 97.29), न्यू इंग्लिश स्कूल हिंजवडी (कला- 67.85, वाणिज्य- 91.11), माध्यमिक विद्यालय भूगाव (वाणिज्य- 96.55), राणी लक्ष्मीबाई सैनिकी शाळा कासारआंबोली (विज्ञान- 74.32), बालाजी ज्युनियर कॉलेज ताथवडे (विज्ञान- 100, वाणिज्य- 100), मारूंजी विद्यालय (वाणिज्य आणि विज्ञान दोन्ही 100), संपर्क विद्यालय भांबर्डे (वाणिज्य- 68.18), सूर्यदत्ता महाविद्यालय बावधन (कला- 96.38, वाणिज्य- 93.23, विज्ञान- 100, व्यवसाय विभाग- 100), अनुसया ओव्हाळ विद्यालय माण (कला- 74.19, वाणिज्य- 82.35), माध्यमिक विद्यालय उरवडे- 90.32), चैतन्य ज्युनियर कॉलेज नांदे (विज्ञान- 100), चाणक्य ज्य़ुनियर कॉलेज पिरंगुट (विज्ञान - 100, वाणिज्य- 100)

Edited By : Nilesh J shende
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Open or Closed Update: अनंत चतुर्थीला महाराष्ट्रात बँका सुरू की बंद? RBI कडून मोठी अपडेट

IND vs WI, Live Streaming: भारत-वेस्ट इंडिज संघात ३ वनडे अन् ५ टी२० सामन्यांचा रोमांच! कधी, कुठे अन् किती वाजता पाहाणार मॅच?

Nandigram By-Election Symbol Controversy : निवडणूक आयोगाचा कारभार पुन्हा चव्हाट्यावर; 183 चिन्हं असताना 'लिफाफा' वरच वाद का? हायकोर्टानं कोणाला सुनावलं?

Latest Marathi News Live Update : मतचोरी करून खासदार झालेले कायदा बनवतायत : राहुल गांधी

Thane Water Supply: ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! २४ तास पाणीकपात, कोणत्या भागांना फटका?

SCROLL FOR NEXT