success story Wireman's son became judge Passed JMFC exam in first attempt education pune
success story Wireman's son became judge Passed JMFC exam in first attempt education pune  sakal
पुणे

Success Story : वायरमनचा मुलगा झाला न्यायाधीश

सनील गाडेकर @sanilgadekar

पुणे : घरामध्ये कोणीही वकील किंवा न्यायाधीश नाही. मात्र न्यायक्षेत्रात चांगले काम करण्याची प्रामाणिक इच्छा. योग्य मार्गदर्शन आणि जिद्दीच्या जोरावर एका सर्वसाधारण कुटुंबातील वायरमनचा मुलगा असलेल्या वकिलाने पहिल्याच प्रयत्नात प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी (जेएमएफसी) पदाच्या परिक्षेत यश मिळवले आहे.

हितेश शांताराम सोनार असे या २९ वर्षीय वकिलाचे नाव. ॲड. सोनार हे मूळचे भुसावळ येथील रहिवासी आहेत. त्यांचे वडील शांताराम सोनार हे वायरमन म्हणून निवृत्त झाले आहेत. तर आर्इ सरोज या गृहिणी आहेत.

एक मुलगा आणि दोन मुली असे सोनार यांचे कुटुंब. वडिलांची नोकरी हाच सोनार कुटुंबीयांचा उत्पन्नाचा मुख्य स्रोत. त्यावर उदरनिर्वाह करीत त्यांनी मुलांचे शिक्षण पूर्ण केले. ॲड. सोनार यांचे पूर्ण शिक्षण भुसावळ येथेच झाले. २०१३ मध्ये त्यांनी रसायनशास्त्र विषयात पदवी पूर्ण केली. त्यानंतर २०१७ मध्ये एलएलबीची पदवी घेतली.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ ते एलएलबी विषयात सुवर्ण पदक विजते आहेत. त्यानंतर त्यांनी पुण्यात प्रॅक्टीस सुरू केली. या यशाबाबत ॲड. सोनार यांनी सांगितले की, ‘‘भुसावळमध्ये मर्यादित संधी असल्याने मी पुण्यात प्रॅक्टीस सुरू केली. ॲड. विजयसिंह ठोंबरे व ॲड. रूपाली पाटील-ठोंबरे यांनी मला मार्गदर्शन केले.

पहिल्यापासूनच कायदा आणि त्यासंदर्भातील स्पर्धा परिक्षा यांची आवड असल्याने मी तसा अभ्यास सुरू केला व पहिल्याच प्रयत्नात यश आले. आमच्या कुटुंबातील सर्व सदस्य, सहकारी मित्र आणि वरिष्ठांनी मला वेळोवेळी मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांचा यशात मोठा वाटा आहे.’’

मुलाला देशाच्या न्यायव्यवस्थेत न्यायाधीश म्हणून योगदान देण्याची संधी मिळाल्याने आमच्यासाठी आकाश ठेंगणे झाले आहे. आमच्या मुलाने एवढे मोठे यश मिळवले, यावर आमचा अजूनही विश्‍वास बसत नाहीये. त्याच्या यशाचा आम्हाला मोठा आनंद आणि अभिमान आहे, अशी भावना ॲड. सोनार यांच्या आर्इ-वडिलांनी व्यक्त केली.

दोनदा सरकारी नोकरीची संधी सोडली

ॲड. सोनार यांच्या पत्नी भाग्यश्री सोनार या देखील वकील आहेत. सोनार दांपत्य दोघेही बरोबरच प्रॅक्टीस करतात. ॲड. सोनार यांना आत्तापर्यंत दोनदा सरकारी नोकरी करण्याची संधी मिळाली होती. मात्र न्यायक्षेत्रातच काम करायचे असल्याचे त्यांनी त्या संधी नाकारल्या आणि वकिलीच सुरू ठेवली.

प्रॅक्टीस ठरली महत्त्वाची

प्रॅक्टीस सुरू केल्यानंतर मला माझ्या वरिष्ठांनी मोठे गुन्हेगारी खटले हाताळण्याची संधी मिळाली. त्यामुळे मला न्यायव्यवस्था अधिक चांगल्या पद्धतीने समजता आली. जेएमएफसीचे विषय वकीलीशी निगडित आहेत. त्यामुळे प्रॅक्टीस करीत असतानाच अभ्यास होत गेला. प्रॅक्टीस आणि अभ्यासाची आवड या दोन्हीमुळे या परिक्षेत यश मिळवणे सोपे झाले, असे ॲड. सोनार यांनी सांगितले.

प्रामाणिकपणे न्यायक्षेत्राची सेवा करण्याची इच्छा आहे. त्यासाठीचे प्रयत्न मी प्रॅक्टीस करीत असताना देखील केले. काही बाबींमुळे एलएलएमचे शिक्षण घेता आले नाही. आता मात्र राहिलेले शिक्षण देखील पूर्ण करणार आहे.

- ॲड. हितेश सोनार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Elections 2024 : केजरीवालांच्या भविष्यवाणीवर अमित शाहांचं उत्तर; म्हणाले, संविधानात कुठे लिहिलंय की मोदी...

James Anderson Retirement : बाजूला होण्याची हीच योग्य वेळ... जेम्स अँडरसनने पोस्ट करून सांगितला निवृत्तीचा प्लॅन

Latest Marathi News Live Update: केजरीवालांनंतर सोरेन यांना दिलासा मिळणार का? १३ मे रोजी सुप्रीम कोर्टात सुनावणी

मावळमध्ये कोणाचा मुलगा पडला? मुलीलाही निवडून आणता आलं नाही म्हणणाऱ्या अजित पवारांना बजरंग सोनवणेंचे प्रत्युत्तर

Asaduddin Owaisi: "इथं जन्मलो, इथंच मरणार, देशातून पुन्हा..."; ओवैसींचा मोदी-शाहांवर हल्लाबोल

SCROLL FOR NEXT