ho.jpg 
पुणे

पुण्यातील जुन्नरमधील 'या' गावात जमिनीच लागली चालू अन्...

मिननाथ पानसरे

आपटाळे : जुन्नर तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील भिवाडे बुद्रुक येथे सध्या जमिनीला मोठ्या भेगा पडत आहेत. गावात जमिन सरकून पुढे भेगा पडत आहेत. परिसरात जमिन चालू लागल्याची नागरिकांमध्ये जोरदार चर्चा आहे. 

जुन्नर तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील भिवाडे बुद्रुक येथे सतत पडणाऱ्या पावसामुळे जमिनीला मोठी भेग पडल्याने घरांचे नुकसान झाले आहे, तर सुदैवाने कोणतीही जीवितहानी घडलेली नाही. मात्र शासन व प्रशासन यांनी वेळीच लक्ष न दिल्यास भिवाडे बुद्रुकचे माळीण होण्याची भीती स्थानिक ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. 

तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागात गेल्या काही दिवसांपासून सतत पाऊस सुरू आहे. भिवाडे बु. हे गाव डोंगराच्या पायथ्याशी वसलेले आहे. गाव ज्या डोंगराच्या पायथ्याशी वसलेले आहे, त्या डोंगराळ भागात मोठी भेग पडल्याची घटना शनिवार (ता. 22 रोजी) घडली आहे.

पावसामुळे शिवाजी विठ्ठल विरणक यांच्या घरापासून ते नदीपर्यंत अंदाजे 300 मीटरपर्यंत जमिनीला मोठ्या आकाराच्या भेगा पडल्या आहेत. जमीन ठिकठिकाणी सरकली असून विद्युत खांब पडले आहेत. विहिरींचे देखील नुकसान झाले आहे. ज्या प्रमाणे माळीन गावात पाणी डोंगरावरून मुरून खाली निघत होते त्याचप्रमाणे भिवाडे बु येथे देखील पाणी गावात मुरून थेट नदीत निघत असल्याचे स्थानिकांनी सांगितले. या पडलेल्या भेगीमुळे भिवाडे येथील रामशेज तलावास धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तवली आहे. या भेगीमुळे शिवाजी विठ्ठल विरणक यांच्या नव्याने बांधलेल्या घरकुलाचे पूर्णतः नुकसान झाले आहे. तर भीमाबाई हरिभाऊ विरणक यांच्या जनावरांच्या गोठ्याचे नुकसान झाले आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

तहसीलदार हणमंत कोळेकर यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी सरपंच नामदेव विरणक, उपसरपंच नंदा विरणक, ग्रामसेवक शशिकांत बागुल व ग्रामस्थांनी घटनेची माहिती तहसीलदार कोळेकर यांना दिली. तलाठ्यांनी तातडीने पंचनामे करण्याचे आदेश यावेळी तहसीलदार कोळेकर यांनी दिले. दरम्यान शासनाने तातडीने या घटनेची गांभीर्याने दखल घ्यावी अशी मागणी आदिवासी भागातील कार्यकर्ते दत्ता गवारी व विष्णू घोडे यांनी केली.

(Edited by : Sagar Diliprao Shelar)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local: लोकलमधून जीवघेणा प्रवास! दिवा-मुंब्रा वळणावर ट्रेन येताच महिला खाली पडली, धडकी भरवणारा VIDEO VIRAL

Gold Investment: आज 50 हजारांचं सोनं घेतलं तर 10 वर्षांनी किती लाखांचं होईल? जाणून घ्या गणित

खंजिरीचे बोल! राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची कथा आता मोठ्या पडद्यावर; 'हा' अभिनेता साकारतोय मुख्य भूमिका, तुम्ही ओळखलंत?

Grahana Yoga 2026 : ग्रहण योग आणि अमावस्येचा भयानक संयोग; कोणत्या राशींवर होणार वाईट परिणाम? सूर्य-केतूच्या युतीनं 'या' लोकांचं वाढू शकतं टेन्शन

Marathi News Live Updates : गणेशोत्सवात गैरहिंदू ठेकेदारांना कामे देऊ नका; भाजप गटनेत्याच्या पत्राने खळबळ

SCROLL FOR NEXT