shugarcane 
पुणे

ऊस उत्पादकांना अखेर दिलासा, प्रतिटन 2500 रूपये दर मिळणार

रमेश वत्रे

केडगाव (पुणे) : सध्याचे गुळाचे दर विचारात घेता दौंड तालुक्यात गु-हाळांना ऊस देणा-या शेतक-यांनी किमान 2500 रूपये प्रतिटन या दराने ऊस द्यावा. गु-हाळमालक किंवा ऊस पुरवठादार (वाहतूकदार) यांनी हा दर पाळावा, असा निर्णय आज दौंड तालुक्यातील केडगाव येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला. 

दौंड तालुक्यात गु-हाळांवर गाळप होणा-या उसाला कवडीमोल दर मिळत असल्याचे वृत्त सकाळमधून प्रसिद्ध झाले. त्यानंतर भाजपचे जिल्हा सचचिटणीस राजाराम तांबे, शेतकरी संघटनेचे राजेंद्र कदम, राष्ट्रवादी कांग्रेसचे शांताराम बांदल, सचिन शिंदे यांनी आज दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळासमवेत बैठक आयोजित केली होती. या बैठकीत सर्वांच्या चर्चेतून 2500 रूपयांचा दर ठरविण्यात आला. 

या बैठकीला बाजार समितीचे सभापती दत्तात्रेय पाचपुते व उपसभापती संपत निंबाळकर, संचालक संभाजी ताकवणे, दिलीप हंडाळ, सागर फडके, माणिक राऊत, रामभाऊ चौधऱी, सचिव तात्यासाहेब टुले, हनुमंत थोरात, तात्यासाहेब टेळे,मंगेश फडके आदी उपस्थित होते. 

ऊस दराबाबतच्या दैनिक सकाळच्या बातमीचे माजी सभापती दिलीप हंडाळ यांनी या वेळी कौतुक केले. गु-हाळ मालकांची लवकरच बैठक आयोजित करणे, कमी दराने ऊस खरेदी होत असेल त्याला समज देणे, गु-हाळ मालकांना नोटीस बजावणे, या संदर्भात पुन्हा एकदा बैठक आयोजित करणे, ऊस गाळपात विनाकारण अडथळा येणार नाही याची दक्षता घेणे, कमी दराने ऊस खरेदी करणा-यांविरूद्ध शेतक-यांनी शेतकरी कृती समितीकडे तक्रार करावी, आदी निर्णय बैठकीत घेण्यात आले. 

याबाबत बाजार समितीचे सभापती पाचपुते म्हणाले, गु-हाळ चालविणारे, जागा मालक, पुरवठादार हे सर्व शेतकरीच आहेत. प्रत्येकाला नफा मिळाला पाहिजे परंतू यात शेतकरी भरडला जाऊ नये. बाजार समिती शेतक-यांच्यामागे ठामपणे उभी राहिल. 

याबाबत शेतकरी संघटनेचे राजेंद्र कदम म्हणाले, राज्यात गुळाचा व्यापार फार मोठा आहे. साखर कारखान्यांवर जसे एफआरपीचे बंधन आहे. त्याप्रमाणे गु-हाळ चालकांवर एफआरपीचे बंधन पाहिजे. राजाराम तांबे व शांताराम बांदल म्हणाले, एक टन उसापासून सुमारे 115 किलो गुळ तयार होतो. गुळाचा दर 36 रूपये किलो आहे. गुळ उत्पादनावर राज्य व केंद्र सरकारचे कोणतेही बंधन नाही. लाॅकडाउनमुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. कारखाने सध्या बंद आहेत. त्याचा गैरफायदा घेत गु-हाळ चालक व ऊस पुरवठादार शेतक-यांना लुटत आहेत, याचे वाईट वाटते. संभाजी ताकवणे म्हणाले, उसाला अडीच हजार ऊस दर मिळाला नाही तर गु-हाळे बंद पाडली जातील.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local: तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक! प्रवाशांचे होणार हाल; वेळापत्रक पाहूनच बाहेर पडण्याचे आवाहन

New Kabaddi Rules Changes 2026 : कबड्डीचे नियम बदलले! आता बदली खेळाडू आणि लॉबीच्या नियमात मोठा बदल; जाणून घ्या कबड्डीचे नवीन 6 नियम

IND vs WI: वेस्ट इंडिजच्या ऐतिहासिक विजयामागे धोनीचा हात? शाय होपने उघडलं राज; म्हणाला, ‘माहीने मला हेच सांगितलं होतं...’

Latest Marathi News Live Update : निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात ठाकरे बंधूंचा ‘गर्जना मोर्चा’; पालघरमधून मनसैनिक-शिवसैनिक मुंबईत दाखल

BSF Jawan: देशसेवेचे स्वप्न साकारले, २२ वर्षे सीमांवर कर्तव्य बजावले; BSF जवानाचा अचानक मृत्यू, कर्तव्यावर अन् काय घडलं!

SCROLL FOR NEXT