Suhana Swasthyam Festival

 

sakal

पुणे

Suhana Swasthyam Festival: ‘अमृतानुभव’ने आजपासून ‘स्वास्थ्यम्’ला सुरुवात

Suhana Swasthyam Festival Begins with ‘Amritanubhav’: ‘सकाळ’ प्रस्तुत ‘सुहाना स्वास्थ्यम्’ महोत्सवाची सुरुवात ‘अमृतानुभव’ या आध्यात्मिक-संगीतमय कार्यक्रमातून होत असून पुढील तीन दिवस आरोग्यजागराचे उत्सव पुण्यात रंगणार आहेत.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : संतसाहित्यातील ज्ञानामृत रसाळ पद्धतीने उलगडणाऱ्या ‘अमृतानुभव’ या अनोख्या कार्यक्रमाने शुक्रवारपासून (ता. ५) ‘सकाळ’ प्रस्तुत ‘सुहाना स्वास्थ्यम्’ या महोत्सवाला सुरुवात होत आहे. सर्वांगीण आरोग्याचा भव्य महोत्सव असणाऱ्या ‘सुहाना स्वास्थ्यम्’चा हा स्वास्थ्यजागर पुढील तीन दिवस रंगणार आहे.

‘सकाळ’ प्रस्तुत ‘सुहाना स्वास्थ्यम्’ या महोत्सवासाठी ‘सुहाना मसाले’ हे मुख्य प्रायोजक आहेत. विश्वकर्मा विद्यापीठ हे सहप्रायोजक असून, भारती विद्यापीठ हे सहयोगी प्रायोजक आहेत. या महोत्सवाचे हे चौथे वर्ष असून, यंदा या महोत्सवाची व्याप्ती अधिकच वाढली आहे. शुक्रवार ते रविवार (ता. ७) असे तीन दिवस शहरातील विविध भागांमध्ये महोत्सवातील कार्यक्रम होणार असून, यात नामवंत वक्त्यांचे मार्गदर्शन आणि दर्जेदार कार्यक्रमांची पर्वणी पुणेकरांना मिळणार आहे.

आरोग्याच्या आणि जीवनाच्या प्रत्येक पैलूबाबत मार्गदर्शन करणाऱ्या या महोत्सवाला पुणेकरांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. शुक्रवारी (ता. ५) सायंकाळी ६.३० वाजता बालगंधर्व रंगमंदिरात ‘अमृतानुभव’ या कार्यक्रमाने ‘स्वास्थ्यम्’ महोत्सवाला सुरुवात होणार आहे. या कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद मिळाल्याने कार्यक्रमाची सर्व तिकिटे संपली आहेत.

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या ७५०व्या जन्मोत्सवानिमित्त ‘अमृतानुभव’ ही कलाकृती सादर केली जाणार आहे. श्रीरंग गोडबोले लिखित-दिग्दर्शित हा कार्यक्रम ज्येष्ठ गायक रघुनंदन पणशीकर, ज्येष्ठ गायिका आरती अंकलीकर-टिकेकर, संकर्षण कऱ्हाडे, मुग्धा वैशंपायन, प्रथमेश लघाटे, राहुल जोशी, आनंदी जोशी, सचिन इंगळे हे कलाकार सादर करणार आहेत.

संतांनी महाराष्ट्राच्या जनजीवनाची आणि भावविश्वाची आध्यात्मिक बैठक भक्कम केली. संतांचे विचार आणि शिकवण केवळ आध्यात्मिक उन्नतीसाठीच नव्हे, तर एक निरोगी आणि आनंदी जीवन जगण्यासाठी मार्गदर्शक ठरते. हीच शिकवण या कार्यक्रमातून उलगडणार आहे. संतसाहित्य आणि तत्त्वज्ञान यांची रोजच्या अनुभवांशी सांगड घालून गीत सादरीकरण आणि निरूपण स्वरूपात हा कार्यक्रम सादर होईल.

मेट्रोचा वापर करण्याचे आवाहन

‘सकाळ’ प्रस्तुत ‘सुहाना स्वास्थ्यम्’ या महोत्सवातील तिन्ही दिवसांचे कार्यक्रम स्थळ मेट्रोच्या मार्गांवर आहेत. या महोत्सवासाठी नागरिकांच्या गर्दीनुसार मेट्रोच्या फेऱ्या वाढविण्याचे नियोजनही ‘महामेट्रो’ने केले आहे. त्यामुळे तिन्ही दिवसांच्या कार्यक्रमांना येणाऱ्या नागरिकांनी मेट्रोचा वापर करावा, असे आवाहन ‘सकाळ’ आणि ‘महामेट्रो’ने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सिडकोच्या २६ हजार घरांवरील संभ्रम अखेर दूर! मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; LIG लाभार्थ्यांमध्ये मात्र अनिश्चितता कायम

Crime News: महिलेला क्रूरपणे संपवले; शीर कापले अन् घेऊन गेले, धक्कादायक घटनेनं खळबळ

मिडल ईस्टच्या युद्धाचा मिडल क्लास लोकांना फायदा; 90 हजारपर्यंत करू शकता बचत, पेट्रोल-डिझेलच टेन्शन संपणार

Numerology : कुटुंबासाठी काहीही करू शकतात 'या' 4 मुलांकाचे लोक, कुणी अपमान केल्यास बदला घेण्यासाठी करतात हद्द पार

IPL 2026: 'मी जेव्हा CSK साठी खेळायचे, तेव्हा...' शिवम दुबेविरुद्ध आक्रमक सेलिब्रेशनवर जडेजाने दिलं स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT