Suicide attempt by a married woman jumping from the sixth floor after drinking finile 
पुणे

विवाहितेने आधी फिनेल पिलं, नंतर सहाव्या मजल्यावरुन मारली उडी; रुग्णालयातच नातेवाईंकामध्ये वाद

सकाळवृत्तसेवा

पिंपरी : फिनेल पिऊन विवाहितेने माहेरच्या राहत्या इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना चिखली येथे सोमवारी (ता.1) सकाळी घडली. महिलेला उपचारासाठी यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रूग्णालयात आणले असता महिलेच्या नातेवाईकांमध्ये 'वायसीएम' समोरच वाद झाला. पोलिस व दंगा नियंत्रक पथकाला पाचारण केल्यानंतर वाद नियंत्रणात आला. 

रूपाली आकाश पाचांगे (वय 20, रा. वाडेबोल्हाई, ता. हवेली) असे आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या विवाहितेचे नाव आहे. विवाहितेची प्रकृती स्थिर असून तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

रूपालीचे सासर वाडेबोल्हाई असून ती रविवारी चिखली घरकुल येथे माहेरी आली होती. सोमवारी सकाळी तिने फिनेल पिऊन राहत्या घराच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारली. इमारतीखाली उभ्या असलेल्या हातगाडीवर पडून ती जखमी झाली. उपचारासाठी तिला तात्काळ महापालिकेच्या वायसीएम रूग्णालयात नेण्यात आले. मात्र, रूपालीच्या नातेवाईकांमध्ये वायसीएम रूग्णालयासमोरच वाद सुरू झाले.

दरम्यान, गोंधळ वाढल्याने वायसीएम सुरक्षारक्षक विभागाने पोलिसांना हा प्रकार कळविला. पोलिस व दंगा नियंत्रक पथक घटनास्थळी दाखल झाल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. मात्र, या प्रकारामुळे रूग्णालय परिसरातील वातावरण तणावपूर्ण झाले होते.

हे वाचा - तात्काळ राजीनामा द्या नाहीतर महाभियोग आणू; ट्रम्प यांना इशारा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुमचा पुलवामा हल्ल्याशी संबंध, मुंबईत २१ वर्षीय तरुणीला डिजिटल अरेस्ट करत ३२ लाखांना गंडा; क्रिकेटरसह ७ जणांना अटक

Latest Marathi News Live Update : नागपूर रेल्वे स्थानकावरील प्लॅट फॉर्म क्रमांक 2 पुढील 52 दिवस राहणार बंद; मध्य रेल्वेचा निर्णय

Iran Israel Conflict: इराणला शस्त्रसंधी अमान्य, मध्यस्थांचा प्रस्ताव फेटाळला; अमेरिकेन तळांना केलं टार्गेट!

Jalna News: बसथांब्याच्या दयनीय अवस्थेमुळे प्रवाशांचे होताहेत हाल; जालना-वडिगोद्री महामार्गावरील प्रकार; उघड्यावरच करावी लागते बसची प्रतीक्षा

Ashok Kharat: दुनिया झुकती है, बस झुकानेवाला चाहिए...; भोंदू अशोक खरातच्या चौकशीत धक्कादायक खुलासा! काळ्या कारनाम्याचे गुपित उघड

SCROLL FOR NEXT