SUICIDE.jpg 
पुणे

धक्कादायक : मुलाची गळफास घेऊन आत्महत्या, तर आईचा...

सकाळवृत्तसेवा

गोखलेनगर (पुणे) : शनिवारी रात्री नऊच्या सुमारास गोखलेनगरच्या रामोशीवाडी येथे राहत्या घरी अक्षय सुधाकर अलुरकर यांनी आत्महत्या केली. तर अक्षयच्या आईचा आकस्मात मृत्यू म्हणून चतुश्रृंगी पोलिस स्टेशनला नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय अलुरकर (वय ३०) त्याची आई नलिनी अलुरकर (वय ५०) हे दोघे एकत्र रामोशीवाडी या ठिकाणी राहत होते. मागील सहा महिन्यांपूर्वी वडिलांचे रेल्वेने प्रवास करत असताना निधन झाले होते. परंतु, वडिलांचे पार्थिव त्यांना मिळाले नव्हते. वडिलांचा मृत्यू होऊन सहा महिने झाले नाहीत, तोपर्यंत अक्षय व त्याची आई नलिनी यांचा मृत्यू झाला आहे. अक्षयने राहत्या घरी फॅनला गळफास घेऊन आत्महात्या केली. तर त्याची आई नलिनी यांचा मृतदेह घरातच आढळून आला.

नलिनी या आगोदरच काही तासांपूर्वी मृत्यू पावल्या होत्या. जनवाडी पोलिस चौकीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक समीर चव्हाण हे घटनास्थळी दाखल झाले तेव्हा, नलिनी यांच्या मृत शरीराचा वास येत होता, असे चव्हाण यांनी सांगितले. घर भाड्याने देणे-घेणे एजंट म्हणून अक्षय काम करत होता. मयत अक्षय व त्याची आई नलिनी यांचे पार्थिव ससून रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठविले आहे, अशी माहिती चतुश्रृंगी पोलिस स्टेशन कडून मिळाली आहे.सदर प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक बसवराज माळी हे करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

Latest Marathi News Live Update : कोकणातही दुष्काळाची परिस्थिती; भातपिकाला मोठा फटका

TVK West Bengal Expansion : तमिळनाडूनंतर आता 'या' राज्यातही विजय यांच्या 'टीव्हीके'ची एन्ट्री? पक्ष कार्यालय उद्घाटनानंतर राजकीय चर्चांना उधाण

SCROLL FOR NEXT