sukhdev.jpg 
पुणे

धक्कादायक ! देशासाठी फासावर गेलेल्या सुखदेव यांच्या बलिदानाचा बालभारतीला पडला विसर

सकाळवृत्तसेवा

पुणे : भगतसिंग, राजगुरू यांच्याबरोबर देशासाठी फासावर गेलेल्या सुखदेव यांच्या बलिदानाचा विसर बालभारतीला पडला आहे. आठवीच्या मराठीच्या एका धड्यात सुखदेव यांचे नाव वगळण्यात आले आहे. दरम्यान, यात बालभारतीची चूक नसल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. आठवीच्या अभ्यासक्रमातील मराठीच्या पुस्तकात क्रांतिकारक भगतसिंह, राजगुरु यांच्याबरोबर कुर्बान हुसेन अशा नावाचा उल्लेख करण्यात आल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.

भारतीय स्वातंत्र्य समराच्या इतिहासात भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांचे बलिदान सर्वश्रृत आहे. या तिघांना फासावर देण्यात आले. तरीही एका धड्यात सुखदेव यांचे नाव वगळण्यात आले आहे. बालभारतीकडून मात्र ही आमची चूक नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

बालभारतीचे संचालक विवेक गोसावी यांनी सांगितले, की प्रसिद्ध लेखक यदुनाथ थत्ते यांच्या प्रतिज्ञा या पुस्तकातील 'माझ्या देशावर माझे प्रेम आहे' हा पाठ जसाच्या तसा वापरण्यात आला आहेत. त्या लेखात सुखदेव यांचे नाव नव्हते. ते बालभारतीकडून वगळण्यात आलेले नाही. ही आमच्याकडून झालेली चूक नाही."

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

एखादा लेख पाठ्य पुस्तकासाठी वापरण्यापूर्वी त्यातील चुका तपासल्या जात नाही का, या प्रश्नावर गोसावी म्हणाले, "भाषा विषयात एखाद्या लेखकाचे लिखाण हे जसेच्या तसे घेतले जाते, त्यात बदल केला जात नाही." "कुर्बान हुसेन हे देखील स्वातंत्र्य सैनिक होते. त्यांना सोलापूर येथे फाशी देण्यात आली आहे. भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांची नावे एकत्रितपणे घेतली जात असली, तरी थत्ते यांच्या लेखातच सुखदेव यांचे नाव नव्हते," असे त्यांनी सांगितले.

धड्यातील वाक्य

''भगतसिंग, राजगुरु, कुरबान हुसेन हे फासावर गेले. ते देशावर खरेखुरे प्रेम करत होते.”

कोण होते कुर्बान हुसेन?

अब्दुल रसूल कुर्बान हुसेन हे सोलापूर येथील स्वातंत्र्य चळवळीतले पत्रकार होते. कुर्बान हुसेन यांना इंग्रजांनी स्वातंत्र्य  लढ्यातील सहभागाबद्दल दोषी ठरवून 12जानेवारी 1931 रोजी फासावर चढविण्यात आले. त्यावेळी कुर्बान हुसेन यांचे वय अवघे 22 वर्षे होते. त्यांनी त्यांच्या 'गझनफर' या वृत्तपत्रातून स्वातंत्र्यलढा, कामगारांचे प्रश्न, हिंदु-मुस्लिम ऐक्य यासह विविध विषयांवर लेखन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 1st T20I: शे होप पुन्हा नडला, पण पदार्पणवीर नमन धीरने दाखवला इंगा! रुदरफोर्डच्या आक्रमणाने विंडिज १७० धावा पार

Vidhan Parishad Election : विधान परिषद निवडणुकीच्या प्रभारीपदी चंद्रकांत पाटील; निवडणूकप्रमुखपदी राजेश पांडे

Delhi High Voltage Drama : राहुल गांधी, प्रियांका गांधी यांना पोलिसांनी घेतले ताब्यात; बळाचा वापर केल्याने दिल्लीत तणावाचे वातावरण

Car Accident : तिरुपतीहून परतणाऱ्या देगलूरच्या भाविकांच्या कारला अपघात; कृषी व्यावसायिक ठार, चार जखमी

Pune Teachers Constituency Election : शिवसेना भाजपमध्ये बंडखोरी, पुणे शिक्षक अर्ज दाखल; भाजपच्या कौस्तुभ गावडे यांच्याविरोधात शिवसेनेचे चिवटे रिंगणात

SCROLL FOR NEXT