Swargate Sakal
पुणे

स्वारगेट व सारसबाग येथे रविवारी वाहतुकीत बदल

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीच्या पार्श्‍वभुमीवर स्वारगेट येथील जेधे चौक व सारसबाग परिसरात वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीच्या पार्श्‍वभुमीवर स्वारगेट (Swargate) येथील जेधे चौक व सारसबाग (Sarasbaug) परिसरात वाहतुकीत बदल (Traffic Changes) करण्यात आला आहे. त्यामुळे वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन वाहतुक शाखेतर्फे करण्यात आले आहे. (Sunday Traffic Changes at Swargate and Sarasbaug)

जेधे चौकातुन सारसबाग चौकाकडे जाण्यासाठी वाहनांना रस्ता बंद असेल. वाहनचालकांनी जेधे चौकाकडून सिंहगड रोडला जाण्यासाठी व्होल्गा चौक, मित्रमंडळ चौक,सावरकर चौक मार्गे सिंहगड रस्त्याने जावे. जेधे चौकातील उड्डाणपुलावरुन (वायजंक्‍शन) सारसबागेकडे वाहनांना जाण्यास प्रवेश बंद केला आहे. कात्रजकडून सारसबागकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी उड्डाणपुलावरुन न जाता लक्ष्मीनारायण (व्होल्गा चौक) चौकातुन डावीकडे वळून इच्छितस्थळी जावे.

वेगासेंटर ते सारसबागपर्यंत ग्रेडसेप्रेटरमधून वाहनांना जाण्यास बंदी असेल. वेगा सेंटरपासून घोरपडी पेठ उद्यान, राष्ट्रभुषण चौकापासून हिराबाग चौकाकडे जावे. पुरम चौक ते जेधे चौक या रस्त्यावरील एकेरी मार्गात वाहनांना आवश्‍यकतेनुसार दुपारी तीन वाजल्यापासून ते रात्री 12 पर्यंत शिथीलता देऊन दुहेरी प्रवेश देण्यता येईल, असे वाहतुक शाखेच्यावतीने कळविण्यात येणार आहे.

'स्वारगेट ते सारसबाग परिसरात नागरीकांची गर्दी होऊ नये, यादृष्टीने तेथे पोलिस अधिकारी व कर्मचारी काळजी घेतली. त्याचबरोबर वाहतुक सुरळीत राहील, यादृष्टीनेही वाहतुक शाखेकडून प्रयत्न केले जातील.'

- डॉ. रवींद्र शिसवे, पोलिस सहआयुक्त.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China reaction on Nepal Political Crisis: नेपाळमध्ये अराजकता अन् सत्तेची उलथापालथ; अखेर चीनलाही सोडावं लागलं माैन!

हृता दुर्गुळे आठवीतच पडलेली प्रेमात, आईला कळलं आणि... अभिनेत्रीने सांगितला किस्सा, म्हणाली...'आईच्या फोनवर मी त्याला...'

Latest Marathi News Updates Live: पुण्यात शिवसैनिक बैठकीत कार्यकर्ते नाराज

IT Job Scam : आयटी क्षेत्रातील फसवणुकीचा पर्दाफाश; प्रशिक्षणाच्या नावाखाली लाखो रुपयांचा गंडा

Pune News : दीड वर्षात तब्बल चाळीस हजाराहून नागरिक जखमी, मोकाट कुत्र्यांचा उपद्रव; नगरिकांमध्ये भीतीचे वातावरण

SCROLL FOR NEXT