Baramati sakal
पुणे

Baramati: राज्यसभेवर सुनेत्रा पवारांची निवड होताच बारामतीत कार्यकर्त्यांचा जल्लोष!

Ajit Pawar: कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत सुनेत्रा पवार यांना खासदारकी मिळाल्याने आनंद व्यक्त केला |Activists expressed their happiness for getting Sunetra Pawar MP by throwing gulala

मिलिंद संगई, बारामती

Sunetra News: राज्यसभेवर सुनेत्रा पवार यांची खासदार म्हणून बिनविरोध निवड झाल्याबद्दल बारामतीत आज राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

शहरातील शारदा प्रांगण व कसब्यातील राष्ट्रवादी भवनसमोर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत एकमेकांना लाडू भरवत जल्लोष केला. महिला व पुरुष कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत सुनेत्रा पवार यांना खासदारकी मिळाल्याने आनंद व्यक्त केला.

एकच वादा अजितदादाच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. सुनेत्रा पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याची बातमी बारामतीत आल्यानंतर कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला.

दरम्यान सुनेत्रा पवार यांना राष्ट्रवादीच्या कोट्यातील एक केंद्रीय राज्यमंत्रीपद देखील मिळणार असल्याची चर्चा सुरु असल्याने अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांत आज अत्यंत उत्साहाचे वातावरण होते. लोकसभा निवडणूकीतील निकालानंतर आज प्रथमच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकत्र आले आणि त्यांच्या चेह-यावर हास्य बघायला मिळाले.

बारामतीला तीन खासदार...अच्छे दिन येणार...

ज्येष्ठ नेते शरद पवार हे राज्यसभेचे खासदार आहेत, सुप्रिया सुळे या लोकसभेच्या निवडणूकीतून निवडून गेल्या आहेत, आता सुनेत्रा पवार याही राज्यसभेवर खासदार म्हणून नियुक्त झाल्याने बारामतीचे तीन खासदार लोकसभा व राज्यसभेत प्रतिनिधीत्व करताना दिसणार आहेत. एकाच कुटुंबातील तीन व्यक्ती राष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधीत्व करणार असल्याने बारामती लोकसभा मतदारसंघाला आता अच्छे दिन येणार अशी लोकांमध्ये चर्चा आहे. सुनेत्रा पवारांना जर राज्यमंत्रीपद मिळाले तर त्या निमित्ताने विकासाला गती मिळेल अशी अपेक्षाही व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोक शिव्या देतात, स्वागताला आलेल्या कार्यकर्त्यांना अजितदादांनी झापलं; VIDEO VIRAL

Maharashtra Latest News Update: माजी आमदार बाबाजानी दुर्रानी यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत सदस्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

Income Tax Return : कर सल्लागारांची तारेवरची कसरत; प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्याची तारीख वाढविल्याचा परिणाम

BCCI निवड समितीमधील 'या' सदस्याची उचलबांगडी करणार, अजित आगरकरचा करार...

UPSC Mains: युपीएससी मेन्समध्ये उत्तर लिहिताना 'या' 5 चुका करू नका, अन्यथा...

SCROLL FOR NEXT