पुणे

मेहता पब्लिशिंग हाऊसचे संचालक सुनील मेहता यांचं निधन

सकाळ डिजिटल टीम

पुणे: मेहता पब्लिशिंग हाऊस या प्रकाशन संस्थेचे संचालक सुनील मेहता यांचं आज वयाच्या 56 व्या वर्षी निधन झालं आहे. अल्पशा आजाराने त्यांचं निधन झालं असून किडनी स्टोनवरील उपचारासाठी त्यांना पूना हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आलं होतं. गेल्या 15 दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते पण उपचारादरम्यान त्यांचे एकेक अवयव फेल होत गेले.

दोन दिवस त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. आज बुधवारी दुपारी 4 वाजता त्यांचे निधन झालं असून उद्या त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. प्रकाशन व्यवसायाला आधुनिक रुप देण्याऱ्या प्रकाशकांमध्ये त्यांचं नाव आघाडीने घेतलं जातं. आजच्या अनेक ख्यातनाम लेखकांना त्यांनीच आपल्या प्रकाशन संस्थेच्या माध्यमातून ओळख मिळवून दिली. त्यांनी अनेक विषयांना हात घालणारी दर्जेदार अशा पुस्तकांची निर्मिती करण्यावर सातत्याने भर दिला होता. मेहता यांच्या निधनानंतर सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मेहता यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी म्हटलंय, ’मेहता पब्लिशिंग हाऊस’ या अग्रगण्य प्रकाशन संस्थेचे संचालक सुनिल मेहता यांचे निधन झाले.अनेक लेखकांची दर्जेदार पुस्तके त्यांनी प्रकाशित केली आहेत.याशिवाय इतर भाषांतील अनेक पुस्तके मराठी भाषेत आणण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्या निधनामुळे साहित्यक्षेत्राची मोठी हानी झाली आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunetra Pawar: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बजावला मतदानाचा हक्क, अजितदादांची ‘ती’ परंपरा जपली

Mahagaon kidnapping Case: महागाव नगर पंचायतच्या उपाध्यक्षांचे अपहरण; बंदुकीच्या धाकावर पत्नी, मुलींनाही नेले, खळबळजनक घटना!

Ajit Pawar : अजित पवार यांच्या निधनानंतर पहिल्यांदाच जिल्हा परिषद निवडणुका, हसन मुश्रीफ काय म्हणाले

Hacking Risk : इंटरनेट नसतानाही हॅक होतोय मोबाईल; 5G ते अचानक 2G अन् नंतर 'खतरनाक खेळ' सुरू, पाहा तुमच्यासोबतही 'हे' सुरुय का?

Gold Rate Today : सोनं पुन्हा महागलं! सर्वसामान्यांची निराशा, आठवड्यात तिसरी दरवाढ; पाहा आजचा ताजा भाव

SCROLL FOR NEXT