deshmukh.jpg 
पुणे

विजयस्तंभ शौर्यदिन कार्यक्रमाबाबत पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख म्हणाले...

शरद पाबळे

कोरेगाव भीमा (पुणे) : कोरोनामुळे सर्वच जातिधर्माच्या कार्यक्रमांवर परिणाम झाला आहे. येत्या एक जानेवारीला पेरणे येथील ऐतिहासिक विजयस्तंभ शौर्यदिन कार्यक्रमाचा योग्य निर्णयही त्यावेळची परिस्थिती पाहून सरकार घेईल, अशी माहिती नवे जिल्हा पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी दिली. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

देशमुख यांनी पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर प्रथमच शिरूर-हवेलीला भेट देत, तुळापूर, वढू, पेरणे तसेच कोरेगाव भीमा येथे भेटी देत अधिकाऱ्यांशी चर्चा केली. रविवारी दुपारी देशमुख यांनी सर्वप्रथम पेरणे (ता. हवेली) येथे भेट देऊन येथील ऐतिहासिक विजयस्तंभाची पाहणी केली. त्यानंतर तुळापूर येथील छत्रपती संभाजी राजांच्या बलिदान स्थळाची पाहणी करून त्यांनी अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. यावेळी लोणीकंदचे पोलिस निरीक्षक प्रताप मानकर व इतर अधिकारी त्यांच्यासमवेत होते. त्यानंतर देशमुख यांनी कोरेगाव-भीमा येथे भेट देत 2018 मध्ये येथे झालेल्या दंगलीची शिक्रापूरचे पोलिस निरीक्षक सदाशिव शेलार व सहाय्यक पोलिस निरीक्षक मयूर वैरागकर यांच्याकडून माहिती घेत मुख्य चौकात पाहणी केली. त्यानंतर वढू बुद्रुक येथेही छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळास व गोविंद गोपाळ समाधी स्थळास भेट दिली. 
तर एक नोव्हेंबरपासून मराठा समाज रस्त्यावर उतरेल; विनायक मेटे यांचा इशारा

जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या रोखण्याबाबत आगामी नवरात्रोत्सव तसेच इतर कार्यक्रमात अधिक काळजी घ्यावी लागेल. त्यादृष्टीने पारंपरिक विधी व कार्यक्रम वगळता इतर मिरवणुकांवर निर्बंध आणणे, कोरोना प्रसार रोखण्याच्या दृष्टीने अत्यावश्‍यक आहे. जिल्ह्यात परप्रांतीय कामगार मोठ्या प्रमाणावर असल्याने सहज मिळणाऱ्या शस्त्राचे प्रमाणही मोठे असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न कसोशीने सुरू आहे. औद्योगिक क्षेत्रात गुंडगिरीला चाप लावणार आहे. 
- अभिनव देशमुख, जिल्हा पोलिस अधीक्षक 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT