Superstition Sakal
पुणे

अंद्धश्रद्धेचा कळस; पुण्यात मांत्रिकाने महिलेला नग्न करत घातली अंघोळ

सकाळ डिजिटल टीम

पुणे : घरातील भानामती नाहीशी व्हावी, व्यवसायामध्ये भरभराटी यावी आणि घरांमध्ये सुख शांती नांदावी यासाठी पुण्यात मांत्रिकाने महिलेला नग्न करून अंघोळ घातल्याचा घृणास्पद प्रकार घडला आहे. मंत्रिकाने सासू सासऱ्यासमोर आणि आपल्या पतीसमोर महिलेला नग्न करत अंघोळ करायला लावली आहे. या प्रकारानंतर पोलिसांनी आरोपींना अटक करत गुन्हा दाखल केला आहे.

(Superstition in Pune)

या प्रकरणी पती शिवराज गोरडकर, सासरे राजेंद्र कोरटकर, सासू चित्ररेखा कोरटकर यांच्यासह मांत्रिक मौलाना बाबा जमादार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणातील पीडित महिलेचा 2013 मध्ये आरोपी असलेला पती शिवराज गोरडकर याच्या बरोबर विवाह झाला होता. लग्न झाल्यापासून घरातील मंडळीने पीडित महिलेला त्रास देऊन तिच्याबरोबर अनिष्ट प्रथा सुरू केल्या होत्या.

आरोपींनी मांत्रिक बाबा जमादार यांच्या सांगण्यावरून पीडित महिलेला रायगड जिल्ह्यामध्ये एका ठिकाणी नेत तिला मांत्रिकासह सर्व मंडळींच्या समोर नग्न होऊन अंघोळ करण्यास भाग पाडले. त्यानंतर महिलेने दिलेल्या तक्रारीवरून या आरोपींना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, आजही महाराष्ट्रात माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटना घडत असल्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan: असीम मुनीर यांच्या हातात पाकिस्तानचा कंट्रोल; अण्वस्त्र अन् तिन्ही सशस्त्र दलांचे मिळाले अधिकार

Latest Marathi News Live Update : पुणे महापालिकेची कनिष्ठ अभियंता भरतीसाठीची परीक्षा स्थगित

"सचिन पिळगावकर यांचं इंडस्ट्रीतील योगदान प्रचंड" ट्रोलिंगवर क्षितिज पटवर्धनने ओढले ताशेरे; "त्यांचे सिनेमे.."

Zudio Sale : झुडिओ Black Friday Sale उद्यापासून सुरू; काय असतील डिस्काउंट ऑफर? कोणत्या वस्तू किती स्वस्त मिळणार..सगळं एका क्लिकवर पाहा

"तुझा मुलगा इंडस्ट्रीत टिकणार नाही" जेव्हा प्रिया बेर्डे यांना प्रसिद्ध व्यक्तीने दिलेली धमकी; म्हणाल्या...

SCROLL FOR NEXT