zendu 
पुणे

पुण्यात झेंडूची आवक वाढली; पावसाचा विक्रीला फटका

महेंद्र बडदे

पुणे : मार्केट यार्ड येथील फुल बाजारात लक्ष्मी पुजनासाठी फुलांची चांगली आवक झाली. झेंडूची सुमारे 75 हजार किलो इतकी आवक झाली. पावसामुळे किरकोळ विक्रीला फटका बसला. 

दसऱ्या नंंतर दिवाळीच्या हंगामात फुलांना चांगले भाव मिळतील अशी फुल उत्पादक शेतकऱ्यांना अपेक्षा होती. लक्ष्मीपूजन आणि पाडव्यासाठी सोमवार पाठोपाठ मंगळवारी (ता.६) मोठ्या प्रमाणावर झेंडू आणि शेवंतीची आवक झाली. परंतु अपेक्षित भाव न मिळाल्याने शेतकऱ्यांची निराशा झाली. झेंडूला प्रति किलोला १० ते ४० तर शेवंतीला ६० ते १०० रुपये भाव मिळाला.  

फुलांचे व्यापारी सागर भोसले म्हणाले की, ''सोमवार पेक्षा मंगळवारी चांगली आवक झाली. परंतू पावसामुळे किरकोळ विक्री वर परिणाम झाला.''व्यापारी प्रकाश काळे म्हणाले,‘‘ दुष्काळी परिस्थितीमुळे दिवाळीत फुलांची आवक कमी होईल असा अंदाज होता. मात्र दसरा आणि दिवाळीच्या नियोजनाने लागवड केलेल्या फुलांचे उत्पादन सुरु होते. दसऱ्या नंतर पाणी कमी पडेल आणि उत्पादन घटेल असा अंदाज होता. मात्र शेतकऱ्यांनी पाण्याची सोय करुन फुले टिकवली. काही शेतकऱ्यांनी चांगले भाव मिळतील या आशेने फुले रोखुन धरली होती. आज मंगळवारी (ता.६) विविध जिल्ह्यांमधुन मोठ्याप्रमाणावर आवक झाल्याने शेतकऱ्यांना अपेक्षित भाव मिळाला नाही. पाणी कमी पडल्याने फुलांचा दर्जा देखील चांगला नव्हता. तर शेवटचा तोडा असल्याने शेतकऱ्यांनी सर्व प्रकारची फुले आणल्याने आवक वाढली होती.''

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अपात्र लाडक्या बहिणींची अंगणवाडी सेविकांना सापडेना घरे! यादीत तालुका, शहराचीच नावे; २६.३० लाख लाडक्या बहिणींचा बंद होणार लाभ; ‘या’ महिला आता कायमच्या अपात्र

आजचे राशिभविष्य - 4 सप्टेंबर 2025

Panchang 5 September 2025: आजच्या दिवशी दुर्गा कवच पठण व ‘शुं शुक्राय नमः’ या मंत्राचा जप करावा

Shivaji Maharaj Teacher: कोण होते शिवाजी महाराजांचे पहिले शिक्षक? या किल्ल्यावर झाली होती अक्षरओळख

अग्रलेख : अर्थपूर्ण आरंभ...

SCROLL FOR NEXT