Amitabh Gupta Sakal
पुणे

सुरेश पिंगळे यांच्या आत्महत्येमागे कौटुंबिक वाद, तरीही सखोल चौकशी करणार

चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्रासाठी पोलिस आयुक्तालयासमोर आत्महत्या करणाऱ्या सुरेश पिंगळे यांच्या पिशवीत दोन पत्रे सापडली होती.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्रासाठी पोलिस आयुक्तालयासमोर आत्महत्या (Suicide) करणाऱ्या सुरेश पिंगळे (Suresh Pingale) यांच्या पिशवीत दोन पत्रे (Letter) सापडली होती. त्यापैकी एका पत्रामध्ये ते सहा महिन्यांपासून कौटुंबिक समस्यांमुळे (Family Issue) तणावाखाली होते, असे नमूद केले आहे.' असा दावा करीत या आत्महत्येच्या प्रकरणामध्ये सखोल चौकशी करणार असल्याचेही पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता (Amitabh Gupta) यांनी स्पष्ट केले.

नोकरीसाठी लागणारे चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र मिळावे, यासाठी पोलिस आयुक्तालयात फेऱ्या मारणाऱ्या पिंगळे यांनी बुधवारी पोलीस आयुक्तालयाच्या प्रवेशद्वारासमोर अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून पेटवून घेतले. उपचार सुरू असतानाच गुरुवारी सायंकाळी त्यांचा एका खासगी रूग्णालयात मृत्यू झाला. दरम्यान, पोलिसांनी गुरुवारी रात्री त्यांच्या कुटुंबीयांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर शुक्रवारी पहाटे मृतदेहावर अंत्यसंस्कार केले.

संबंधीत प्रकरणामध्ये त्यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांवर आरोप केल्यानंतर पुणे पोलिसांवर मोठ्या प्रमाणात टिका झाली होती. या पार्श्‍वभुमीवर पोलिस आयुक्त गुप्ता यांनी शुक्रवारी दुपारी यासंदर्भात पत्रकार परिषद घेतली. गुप्ता म्हणाले, 'पिंगळे यांच्या पिशवीत दोन पत्रे सापडली आहेत. त्यापैकी आठ पानी पत्रात पिंगळे यांना गेल्या सहा महिन्यांपासून कौटुंबिक वादातून त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे नमूद केले आहे. कौटुंबिक वादामुळे ते तणावाखाली होते. नोकरीसाठी त्यांनी चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्रासाठी अर्ज केला होता. मात्र, चुकीचा पत्ता दिल्याने त्यांना पुन्हा अर्ज करण्यास सांगण्यात आले होते.'

पडताळणीपर्यंत पिंगळे नावाच्या दुसऱ्या एका व्यक्तीविरुद्ध कोथरूड, समर्थ, सहकारनगर समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाली होती. नामसाध्यर्मामुळे पिंगळे यांना त्रासाला सामोरे जावे लागले. त्यापैकी दोन पोलिस ठाण्यातील अहवालात सुरेश पिंगळे यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल नसल्याचा अहवाल पाठविला होता. कोथरूड पोलिसांकडून पडताळणी अहवाल मिळणे बाकी होते. शासन निर्णयानुसार तीस दिवसांच्या कालावधीत दाखला देणे बंधनकारक आहे. हे प्रकरण संवेदनशील आहे. त्यामुळे पोलिसांकडून सखोल चौकशी केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

'सुरेश पिंगळे आत्महत्येची घटना दुर्देवी आहे. पिंगळे नावाच्या दुसऱ्या व्यक्तीविरुद्ध गुन्हे दाखल होते. त्यामुळे चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र मिळण्यास विलंब झाल्याने त्यांनी आत्महत्या केली. या प्रकरणाची पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे.'

- दिलीप वळसे - पाटील, गृहमंत्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission ला 10 महिने पूर्ण, सॅलरी-पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर काय झालं? जाणून घ्या लेटेस्ट अपडेट

IND vs AFG : जसप्रीत बुमराह 'फिट' न झाल्यास, कोण घेईल त्याची जागा? ३ जबरदस्त गोलंदाज शर्यतीत, एक तर जस्सी नसतानाच चमकतो...

MPSC पेपरफुटी प्रकरणात नरहरी झिरवाळांचे स्वीय सहाय्यक गणेश देवरे यांचा खुलासा; म्हणाले, ‘मी दोषी आढळल्यास...’

कुंभ, मीन अन् मेष राशीच्या लोकांची शनीच्या साडेसातीपासून सुटका कधी? जाणून घ्या टाइमलाइन

Marathi News Live Updates: भागलपूर आणि नौगछिया भागातील पूरपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बिहारचे मुख्यमंत्र्याकडून हवाई पाहणी

SCROLL FOR NEXT