test.jpg 
पुणे

नागरिकांच्या जिवाशी खेळ; स्वॅब टेस्टचा रिपोर्टच मिळेना वेळेत

रीना महामुनी- पतंगे

धनकवडी (पुणे) : कोरोनाचे नवे रुग्ण शोधण्यासाठी शहरभर कोरोनाच्या चाचण्या वाढविण्यात आल्या. त्याकरिता स्वॅब कलेक्शन सेंटर खासगी रुग्णालय वाढविण्यात आले. क्षेत्रिय कार्यालयांतर्गत जागोजागी स्वॅब क्लेक्शन सेंटर उभारले गेले. मात्र, अजूनही अपेक्षित वेळेत रिपोर्ट येत नाही. त्यामुळे रुग्ण आणि कुटुंबियांचे हाल होत आहे. 


पुणे शहरात गेल्या तीन महिन्यांपासून सतत रुग्ण संख्येत वाढ होत आहे. दिवसाला दीड हजारहून अधिक नवे रुग्ण सापडत आहे. तसेच अत्यवस्थ रुग्णही वाढत आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून ज्याठिकाणी रुग्ण सापडतील त्याच्या संपर्कातील रुग्ण शोधून काढणे पाॅझिटिव्ह असलेल्या रुग्णांचे विलगकरण करणे यावर महापालिकाने भर दिला आहे. त्यासाठी खासगी आणि महापालिका रुग्णालय आणि क्षेत्रिय कार्यालयाच्या पातळीवर स्वॅब क्लेक्शन सेंटर सुरू केले असून रॅपिड टेस्ट आणि आरटीपीसीआर टेस्ट सुरू केली आहे.

आरटीपीसीआर टेस्ट रिपोर्ट चोवीस तासात येणे अपेक्षित असते. तोपर्यंतच रुग्णाला विलग ठेवणे गरजेचे असते. मात्र, आरटीपीसीआर चाचणीचा रिपोर्ट येण्यास तीन ते चार दिवसाचा कालावधी लागत आहे. एकदा स्वॅब घेतल्यानंतर रुग्णाला घरी सोडण्यात येते. त्या कालावधीत संसर्ग वाढत असल्याचे दिसून येत आहे. म्हणून गेल्या काही दिवसांमध्ये थोड्या प्रमाणात कमी झालेला कोरोनाचा संसर्ग उपनगरात वाढत आहे. 
 
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सहकारनगर-धनकवडी क्षेत्रीय कार्यलयाचे सहाय्यक आयुक्त नीलेश देशमुख म्हणाले, `क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत धनकवडीतील शरदचंद्र पवार बहुउद्देशीय भवन संसर्ग चाचणी केंद्राचे स्वब क्लेक्शन बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेत पाठविण्यात येते. मात्र, 
गेल्या चार दिवसांपासून स्वॅब क्लेक्शन घेत नाही. कारण त्या महाविद्यालयातील प्रयोगशाळेतील कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे स्वॅब घेणे बंद केले. आरटीपीसीआर चाचणीचासाठी आयसर आणि एनआयबीएम या दोन ठिकाणी पाठविण्यात येत आहे. त्यामुळे रिपोर्ट येण्यासाठी वेळ लागत आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाची प्रयोगशाळा सुरू व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

महापालिकेच्या सहाय्यक आरोग्य प्रमुख डॉ. वैशाली जाधव म्हणाल्या, `एकदा स्वॅब घेतल्यानंतर त्या व्यक्तीचा रिपोर्ट वेळेत देण्याचा सूचना केल्या आहेत. तसेच संबंधित व्यक्तीच्या संपर्कातील व्यक्तीचेही चाचणी केली जाते.'  नगरसेवक विशाल तांबे म्हणाले, `कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न सुरू असून चाचणीचा रिपोर्ट वेळेत आला. तर वेळेत उपचार सुरू होतील आणि कोरोनाचा संसर्ग कमी होईल.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईत आंदोलन करणं CJPला महागात पडलं! अभिजीत दिपकेंसह सर्व आंदोलकांवर गुन्हा दाखल, पोलिसांची कडक कारवाई

Sarva Pitri Amavasya 2026: यंदा सर्वपित्री अमावस्या कधी आहे? जाणून घ्या शुभ तिथी, तर्पण मुहूर्त आणि धार्मिक महत्त्व

हल्लेखोर को-पायलटचं नाव समोर, ओमानमध्ये घातलेली बंदी; कट्टरपंथी विचारसरणीचा असल्याचंही उघड

Latest Marathi News Live Update : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी जंतर-मंतरवर १० ऑक्टोबरला CJPचे आंदोलन

Gold Silver Prices : पितृपक्षामुळे सोने-चांदीची 'झळाळी' पडली फिकी; ग्राहकांची खरेदीकडे पाठ, आता विजयादशमीची आशा, जाणून घ्या दर

SCROLL FOR NEXT