Swasthyam 2022
Swasthyam 2022 Sakal Digital
पुणे

Swasthyam 2022: मानसिक विकार म्हणजे काय?

सकाळ वृत्तसेवा

Swasthyam 2022:

पुणे : मानसिक आजार किंवा विकार ही एक वैद्यकीय स्थिती आहे जी एखाद्या व्यक्तीचे विचार, भाव-भावना, मनःस्थिती, आणि दैनंदिन वर्तणुकीत बदल करू शकते. एखादी व्यक्ती आपल्या दैनंदिन जीवनात येणाऱ्या संकटांना व समस्यांना पूर्ण क्षमतेने सामोरे जाऊ शकत नाही. मानसिक विकाराने सर्व वयोगटातील, विभिन्न लिंगी सर्व समुदाय व समूहातील लोक प्रभावित होऊ शकतात.

मानसिक आरोग्याची देशातील स्थिती :-
जागतिक आरोग्य संघटनेच्या एका अहवालानुसार, भारतातील ७.५% लोकसंख्या ही कोणत्या ना कोणत्या मानसिक समस्येची शिकार आहे. जगभरातील मानसिक आणि मज्जातंतू संबंधित आजारातील भारताचा वाटा १५% आहे. भारतातील दहा लाख लोकसंख्येमागे निव्वळ तीन मानसोपचारतज्ज्ञ असून मानसशास्त्रज्ञांची संख्या तर त्याहून कमी आहे, असेही या अहवालाद्वारे स्पष्ट झाले आहे. अर्थात, प्रती एक लाख व्यक्तीमागे ५.६ मनसोपचारतज्ज्ञ असले पाहिजेत या, निकषांनुसार हे प्रमाण १८ पटीने कमी आहे.

:-
समुपदेशनासाठी हेल्पलाइन वापरण्याचे प्रमाण (आकडे टक्क्यांत)
पुरूष : ६२.९
महिला : ३७.१
---
वयोमानानुसार
१८ ते २९ : ८.१
३० ते ४९ : २१.४
५० ते ६९ : ४९.४
७० पेक्षा अधिक : २१.१
---
राहणीमानानुसार
निमशहरी : ४८.१
शहरी : ४७
ग्रामीण : ४.९
----
शिक्षणानुसार
पदवीधारक : ४२
पदव्युत्तर पदवी : २०.५
उच्चशिक्षित : १४.९
डिप्लोमा, प्राथमिक, माध्यमिक : २२.६
----
खासगी नोकरदार : ३०.१
इतर नोकरदार : १७.४
विद्यार्थी : ११.९
व्यावसायिक : ११.१
गृहिणी, बेरोजगार, सेवानिवृत्त, शेतकरी : २९.५

या कारणांमुळे येतंय नैराश्य

हेल्पलाइनवर येणाऱ्या कॉल्सच्या समस्यांमध्ये प्रामुख्याने काळजी, चिडचिडेपणा, मानसिक विकारांमुळे येणारा ताण व चिंता यामुळे येणारे नैराश्य यासंदर्भातील कॉल्सचे प्रमाण ४९.९% आहे. नातेसंबंधातील ताण-तणाव, वैवाहिक सहजीवनामधील समस्या, एकतर्फी प्रेम यामुळे येणारे नैराश्य यांचे प्रमाण १८.५% आहे. नोकरी व व्यवसायातील आर्थिक अडचणी यामुळे आलेले नैराश्य यांचे प्रमाण ८.७% आहे. तसेच आनुवंशिक आजार मानसिक आरोग्याच्या समस्या, कोरोना यामुळे आलेले नैराश्य या यासंदर्भातील कॉल्सचे प्रमाण त्याखालोखाल आहे.

मनःशांतीसाठी ध्यान-धारणा

प्रतिकूल परिस्थिती किंवा समस्या निर्माण झाल्यावर आपल्या मनामध्ये भावभावनांचा कल्लोळ होतो. अशावेळी आपण भावनिक होऊन, चालू वर्तमानकाळातील आपली बलस्थाने, स्थिती, कौशल्ये व गुण विसरून जातो. आपण सतत हाच विचार करत रहातो, की हा प्रसंग किंवा घटना माझ्या जीवनात का घडली, या प्रसंगातून बाहेर कसे पडायचे व पुढे उद्या पुन्हा अशी समस्या व प्रसंग आपल्या बाबतीत घडू नये यासाठी आपण काय करायला हवे. अशा विचारांमुळे व प्रश्नांमुळे आपण योग्य, शास्त्रीय, परिस्थितीनुसार व जाणीवपूर्वक विचार करत नाही. अशावेळी ध्यान-धारणेमुळे आपल्या मनातील ताण-तणाव दूर होऊन मन प्रसन्न, चिंतामुक्त व काळजीमुक्त होते. ध्यान-धारणेच्या सरावामुळे चालू वर्तमानकाळातील आपली बलस्थाने, स्थिती, कौशल्ये व आपल्या गुणांची आपल्याला जाणीव होते.

ध्यान-धारणेमुळे आपले मन सशक्त होते, त्यामुळे आपल्यापुढे कोणतेही संकट किंवा समस्या निर्माण झाली, तरी आपण प्रसन्न राहू शकतो. नियमित ध्यान-धारणेमुळे आपल्या मनामध्ये एक आंतरिक ऊर्जा निर्माण होते, या ऊर्जेमुळेच आपण अनेक संकटांचा व समस्यांचा प्रभावीपणे सामना करू शकतो. सततच्या ध्यान-धारणेमुळे आपली भावनिक लवचिकता वाढण्यास मदत होते. तसेच, ध्यान-धारणा हा मनाला ताण-तणाव मुक्त कारण्याचा महत्त्वाचा उपाय आहे.

‘ध्यान-धारणे’साठी कोणती तयारी करावी?

  • ध्यान-धारणेसाठी शांत परिसर असलेली जागा निवडावी, जेणेकरून शांत ठिकाणी ध्यान-धारणा करताना कोणताही अडथळा न येता पूर्ण लक्ष केंद्रित करता येईल.

  • ध्यान-धारणेचा सराव नियमित करावा, सातत्याने ध्यान करणे उत्तम. नियमित ध्यान-धारणा केल्याने आपल्यावर होणाऱ्या सकारात्मक परिणामांचे मूल्यमापन करता येणे शक्य होते.

  • ध्यान-धारणा करण्याआधी थोडा हलका शारीरिक व्यायाम करणे गरजेचे आहे. शारीरिक व्यायामामुळे स्नायू मोकळे होण्यास मदत होते.

संपूर्ण निरोगी, आरोग्यदायी जीवनासाठी ‘स्वास्थ्यम्’

आधुनिक, स्पर्धात्मक व धावपळीच्या जीवनात आपले शरीर व मन खूप थकून जाते. त्यामुळे ताण-तणाव वाढून, मानसिक आरोग्य बिघडते. त्यातून नैराश्याच्या प्रमाणात वाढ होते. अनेक प्रयत्न करूनही ताण-तणाव दूर होत नाही. अशा परिस्थितीत शरीर आणि मनाला स्थिर व सुदृढ आरोग्यदायी राखण्यासाठी ध्यान-धारणा, प्राणायाम व योगासने सर्वोत्तम उपाय आहे. तसेच, शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी नागरिकांना शास्त्रीय मार्गदर्शन होणे गरजेचे आहे. नागरिकांची ही गरज ओळखून, ‘सकाळ माध्यम समूहा’तील 'वुई आर इन धिस टुगेदर' मोहिमेअंतर्गत ९ ते ११ डिसेंबर दरम्यान पुण्यात पाच वेगवेगळ्या ठिकाणी तीन दिवसीय संपूर्ण आरोग्यासाठी 'स्वास्थ्यम्' उपक्रम आयोजित करण्यात येत आहे.

असे व्हा सहभागी...

मानसिक आणि शारीरिक आरोग्य राखण्यासाठीच्या ‘स्वास्थ्यम्’ या नावीन्यपूर्ण उपक्रमात सर्व वयोगटातील आणि विविध क्षेत्रातील नागरिक सहभागी होऊ शकतात. तसेच योग, प्राणायाम, अध्यात्म, तंदुरुस्ती आदी क्षेत्रांत कार्यरत असलेल्या विविध संस्था, ग्रुप्स यांनाही सहभागी होता येईल. त्यासाठी खालील वेबसाइट ओपन करून रजिस्ट्रेशन करू शकता.

https://www.globalswasthyam.com/

उपक्रमाच्या माहितीसाठी व अपडेट मिळविण्यासाठी वेबसाइट व खालील सोशल मीडिया पेजेसला भेट द्या !
Facebook: https://www.facebook.com/globalswasthyam
Instagram: https://www.instagram.com/globalswasthyam/
Twitter: https://twitter.com/GlobalSwasthyam
LinkedIn: https://www.linkedin.com/company/global-swasthyam

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'संजय राऊत माझा छळ करत आहेत'; निलम गोऱ्हेंनी वाचून दाखवलं स्वप्ना पाटकरांचं निवेदन

Raj Thackeray: सभेला येतो पण मराठी माणूस मनसेला मतं का देत नाही? राज ठाकरेंनी दिल उत्तर...

Retinal Detachment : तुम्हाला ही झालाय का राघव चड्ढांसारखा ‘हा’ आजार? डोळ्यांशी संबंधित ‘या’ सुरूवातीच्या लक्षणांबद्दल जाणून घ्या

Raver Lok Sabha Constituency : बालेकिल्ल्यात भाजप उमेदवाराला मताधिक्याची महाजनांची ‘गॅरंटी’

Pune School: स्कॉलरशीपची परीक्षा पास पण शाळा निकालच देईनात; महापालिकेचा भोंगळ कारभार

SCROLL FOR NEXT