Pune
Pune sakal
पुणे

हडपसरच्या तुकाई टेकडीवरील स्वयंभू तुकाई माता

कृष्णकांत कोबल

हडपसर : पुणे (Pune) शहरातील टेकड्यांवर वास्तव्यास असलेल्या चतुःशृंगी, तळजाई, पर्वती देवींप्रमाणे हडपसरच्या काळेपडळ परिसरातील एका छोट्या टेकडीवर स्वयंभू तुकाईमातेचे मंदिर आहे. नवरात्रात येथे विविध धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम व उपक्रम राबवून मोठ्या उत्साहात देविचा उत्सव साजरा केला जातो. कोरोनाच्या (Corona) सावटामुळे गेल्यावर्षी हा उत्सव होऊ शकला नाही. या वर्षी नेमके नवरात्र उत्सव सुरू व्हायच्या दिवशीच सरकारने मंदिरे खुली करण्याचा निर्णय घेतल्याने ऐनवेळी मंदिर विश्वस्तांना कार्यक्रमांचे नियोजन करता आले नाही. मात्र, देविच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचे सातत्य येथे पाहवयास मिळत आहे.

तुकाई देविच्या अवतराबाबत एक आख्यायिका सांगितली जाते. राम वनवासात असताना त्यांची परिक्षा घेण्यासाठी पार्वती सीतेचे रूप घेऊन समोर उभी राहिली. तेव्हा रामाने पार्वतीला 'तु का आई' असे म्हणून नमस्कार केला. त्यावरूनच पार्वतीच्या या रूपाला "तुकाई' हे नाव पडले. तुकाईचे मूळ स्थान तुळजापूर येथील घाटशीला येथे आहे. त्यानंतर राज्यात ठिकठिकाणी तुकाईमातेची मंदिरे स्थापन झाली. पुण्यातील पाच-सहा मंदिरांपैकी एक असलेले हडपसरच्या तुकाई टेकडीवरील तुकाईमाता मंदिर हे त्यातीलच एक आहे.

सासवड रस्त्याने जाताना ग्लायडींग सेंटरपासून उजव्या हाताला दिसणाऱ्या वृक्षराजीने फुललेल्या टेकडीवर हे मंदिर आहे. येथून या मंदिराकडे जाता येते. ससाणेनगर-काळेपडळच्या बाजूनेही जाता येते. टेकडीच्या शिखरावर दूरूनच तीन कळस दिसतात. जुन्या तुकाईमाता मंदिरासह गणपती व दत्त दिगंबर अशी ही तीन मंदिरे येथे आहेत. तुकाईमातेचे जुने मंदिर तसेच ठेवून काही वर्षांपूर्वी येथे सभामंडपाचे काम करण्यात आले आहे. मंदिरात एक ते दीड फूट उंचीची स्वयंभू शीळा आहे. हीच ती तुकाई माता.

नवरात्रोत्सवानिमित्त देविचा उत्सव साजरा केला जातो. दसऱ्याच्या दिवशी पालखी मिरवणूक होते. पाहटे पाच व सायंकाळी सात वाजता देवीची आरती होते. माघी पौर्णिमेलाही अशाच पध्दतीने देविची यात्रा भरवून उत्सव साजरा होतो. नवसाला पावणारी देवी म्हणून परिसरासह शहराच्या विविध भागातून व आसपासच्या खेड्यापाड्यातूनही भाविक येथे दर्शनासाठी येतात. नित्य पूजेसाठी येथे पूजाऱ्याची व्यवस्था केली आहे.

टेकडीवर मंदिर परिसरात स्वच्छ हवा, विविध प्रकारचे वृक्ष, खेळणी असल्यामुळे अनेक नागरिक व मुले दररोज येथे यांच्या त असतात. तुकाई माता ट्रस्टच्या वतीने मंदिराची देखभाल केली जाते. सणोत्सवाला मंदिरावर विद्युत रोषणाई केली जाते. वर्षभर विविध सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम राबविले जातात, अशी माहिती विश्वस्त सागर तुपे यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gadchiroli: स्फोटकांनी भरलेले 6 प्रेशर कुकर अन् डिटोनेटर नष्ट...मातीच्या खाणींचा शोध घेण्यासाठी गेलेल्या जवानांची कारवाई

Sunil Gavaskar Video : गावसकरांचा जुना VIDEO व्हायरल, रनरेटवरून विराटवर टीका केल्यानंतर झाले ट्रोल

Latest Marathi News Update : RTE अंतर्गत शालेय प्रवेशाबाबतच्या कायद्यात राज्य सरकारच्या नव्या सुधारणेला हायकोर्टाची अंतरिम स्थगिती

Children Fitness : आहाराकडे थोडे लक्ष दिले तर उन्हाळ्यातही मुले राहतील फिट अ‍ॅण्ड फाइन.! आहारतज्ज्ञ काय सांगतात ?

Pakistan: सौदीच्या प्रिन्सने पाकिस्तानला पाठवली ५० लोकांची खास टीम, शाहबाज सरकारसोबत नेमकं मिशन काय?

SCROLL FOR NEXT