st.jpg
st.jpg 
पुणे

कोरोनाकाळात तुमच्या मोबाईलचे असे करा निर्जंतुकीकरण

सकाळवृत्तसेवा

पुणे : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी मोबाईलसह अन्य गॅझेट, पेन, कीबोर्ड याचेही निर्जुंतुकीकरण करणे तितकेच महत्त्वाचे आहे. नेमकी हीच गरज लक्षात घेऊन सिंबायोसिसमधील एमबीएच्या विद्यार्थ्यांनी ‘सॅनिटायझेशन ड्रॉवर’ या उपकरणाची निर्मिती केली आहे. 

या विद्यार्थ्यांनी वुडबल्क फर्निचर्स या स्टार्टअपव्दारे हे उपकरण विकसित केले आहे. अधिराज सिंह सोलंकी, मुदित शर्मा, राजदीप नाथ, रोहन बोरा आणि तन्झील हुसेन याएमबीएचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी यास्टार्टअपद्वारे हे उपकरण निर्मित केले आहे.

हात स्वच्छ करण्यासाठी आणि स्वच्छता राखण्यासाठी हँड सॅनिटायझर्स किंवा साबणांचा वापर करतो. त्याप्रमाणे कार्यालयात असताना सतत वापरत असलेल्या मोबाईल, माउस, कीबोर्ड याबरोबरच पेन आणि स्टेपलर, फाईल यांचे निर्जुंतुकीकरण करण्यासाठी हे उपकरण वापरता येणार आहे. यूव्ही-सॅनिटायझर आणि एअर प्युरिफायर, एअर क्लीयर  याचा वापर करून साइडटेबलची रचना करून या विद्यार्थ्यांनी कल्पकतादाखवली आहे. या साइड टेबलमध्ये एक

एअर फिल्टर आहे जे यूएस-मुख्यालयातील संशोधन आणि प्रयोग शाळांच्या चाचणी मंडळाद्वारे प्रमाणित केले जाते. लॉकडाऊनमध्ये वसतिगृहात अडकलेले असताना या विद्यार्थ्यांनी उपकरण निर्मितीच्या अभिनव उपक्रमावर काम केले. टेबलाच्या नवीन डिझाइनचा भाग म्हणून ‘सॅनिटायझेशन ड्रॉवर’म्हणून वापरलाजाऊ शकतो, असे या विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT