Crime Sakal
पुणे

लोणी काळभोरमधील सराईत गुन्हेगारासह तिघांवर तडीपारची कारवाई

लोणी काळभोर परिसरातील सराईत गुन्हेगारासह तिघांना पुणे शहर, पिंपरी-चिंचवड व जिल्ह्यातुन तडीपार करण्यात आले आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - लोणी काळभोर (Loni Kalbhor) परिसरातील सराईत गुन्हेगारासह (Criminal) तिघांना पुणे शहर, पिंपरी-चिंचवड व जिल्ह्यातुन तडीपार (Tadipaar) करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश परिमंडळ पाचच्या पोलिस उपायुक्त नम्रता पाटील यांनी दिले.

प्रणव भारत सिरसाठ (वय 20), अभिजीत अभिमन्यु आहेरकर (वय 20), सौरभ गोविंद इंगळे (वय 21, तिघेही रा. लोणी काळभोर) अशी तडीपार करण्यात आलेल्यांची नावे आहेत. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी शहरातील सराईत गुन्हेगारांचा बंदोबस्त करण्याचे आदेश सर्व पोलिस ठाण्यांना दिले आहेत. त्यानुसार लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनीही अशा गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सुचना दिल्या होत्या. पोलिसांकडून पोलिस अभिलेखावरील गुन्हेगारांचा शोध सुरू होता. दरम्यान प्रणव शिरसाठ हा त्याच्या इतर दोन साथीदारांना बरोबर घेऊन परिसरातील नागरिक, व्यापारी यांना शस्त्राच्या धाक दाखवून, त्यांना मारहाण करून त्यांच्याकडून जबरदस्तीने खंडणी उकळत असल्याची माहिती पुढे आली होती.

पोलिसांनी अधिक तपास केला, त्यावेळी संबंधीत टोळीची लोणी काळभोर, कदमाकवस्ती, लोणी स्टेशन परिसरात मोठ्या प्रमाणात दहशत असल्याचे दिसून आले. त्यांच्या गुन्हेगारी कृत्यामुळे नागरिक, व्यापारी वर्गामध्ये भिती व असुरक्षिततेची भावना निर्माण झाली होती. त्यांच्या दहशतीमुळे नागरिक तक्रार देण्यासही पुढे येत नव्हते. त्यामुळे पोलिस निरीक्षक मोकाशी यांनी त्यांना तडीपार करण्यात यावे, याबाबतचा प्रस्ताव तयार करून पोलिस उपायुक्त नम्रता पाटील यांना सादर केला होता. त्यानुसार पाटील यांनी तिघांना दोन वर्षांसाठी तडीपार केले. हि कामगिरी वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक (गुन्हे) सुभाष काळे, पोलिस उपनिरीक्षक अमित गोरे, कर्मचारी गणेश सातपुते, गणेश भापकर यांच्या पथकाने केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lalbaugcha Raja 2026 First Look: मुंबईच्या राजाचं पहिलं दर्शन आज! लालबागच्या राजाचा LIVE सोहळा कुठे पाहाल?

Lakhani Bolero Accident : माहेरची वाट धरली अन् काळाने घाला घातला; तीजसाठी निघालेल्या ९ जणींचा अपघातात करुण अंत

Pune Fraud News : आजार बरा करण्‍याच्‍या बहाण्‍याने भोंदू महिलेने उकळले ४५ हजार; बिबवेवाडीतील भोंदू मोनाली विधातेविरुद्ध गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update : लक्ष्मण हाकेंचा अभिजीत दिपकेंना टोला; म्हणाले, ‘आधी...

PF खात्यातून इमर्जन्सीत पैसे काढायचे आहेत? EPFO ने बदलले नियम, आता मिळतील 'इतके' टक्के पैसे!

SCROLL FOR NEXT