Take action against colleges which do not provide benefits to backward class students 
पुणे

मागासवर्गीय विद्यार्थ्यांना लाभ मिळवून न देणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाई करा 

सकाळवृत्तसेवा

पुणे : मागासवर्गीय विद्यार्थ्यांना त्यांचे हक्क, शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देणे हे महाविद्यालयांचे कार्यच आहे. जर एखाद्या महाविद्यालयाच्या दिरंगाईमुळे शासनाच्या शिष्यवृत्ती लाभापासून विद्यार्थी वंचित राहात असेल, तर अशा महाविद्यालयांवर कारवाई करा, अशा सूचना राज्याचे समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिल्या. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुणे विभागातील क्षेत्रीय अधिकारी यांची प्रादेशिक उपायुक्त कार्यालयात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये नारनवरे यांनी या सूचना दिल्या. पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर ,सोलापूर या जिल्ह्यात समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा आढावा आयुक्त यावेळी घेतला. या प्रसंगी सहआयुक्त भारत केंद्रे, सह आयुक्त वृषाली शिंदे, उपायुक्त प्रशांत चव्हाण , प्रादेशिक उपायुक्त बाळासाहेब सोळंकी, यांच्यासह पुणे विभागातील सर्व सहायक आयुक्त व सर्व जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा उपस्थित होते. 

मोठी बातमी: शिक्षण सेवक भरतीला राज्य सरकारचा हिरवा कंदील; 6 हजार जागांसाठी होणार भरती​ 

विविध योजना राबविताना शिक्षणाला सर्वाधिक प्राधान्य द्यावे, असे सांगून नारनवरे म्हणाले,''नवीन पिढी घडवण्यासाठी अधिकाऱ्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. विभागातील अधिकाऱ्यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून निर्णय घेतल्यास त्या त्या जिल्ह्याच्या विकासात देखील मदत होईल.'' प्रादेशिक उपायुक्त श्री बाळासाहेब सोळंके यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ahilyanagar Ganesh Visarjan : अहिल्यानगरमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीत लाठीचार्ज; तरुणाचा मृत्यू, आमदार संग्राम जगताप यांचे ठिय्या आंदोलन

आजचे पंचांग 24 सप्टेंबर 2026! प्रदोषामुळे खास दिवस; वाचा शुभ मुहूर्त आणि राहुकाळ

Jharkhand Dhuska Recipe: एकदा खाल तर पोहे-उपमाही विसराल! असा बनवा बाहेरून कुरकुरीत, आतून मऊ झारखंडी धुस्का

आजचे राशिभविष्य - 24 सप्टेंबर 2026

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 24 सप्टेंबर 2026

SCROLL FOR NEXT