Untitled-4.gif 
पुणे

अशी सांभाळा वाढत्या थंडीत प्रकृती...

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे शहर व जिल्ह्यातील तापमानात गेल्या दोन दिवसांपासून सातत्याने घट होऊ लागली आहे. मकर संक्रांतीनंतर थंडीचे प्रमाण कमी होण्याऐवजी ते वाढू लागले आहे. तापमानाचा पारा घसरल्याने हुडहुडी वाढली आहे. घटत्या तापमानाबरोबर आरोग्याच्या तक्रारीत वाढ होऊ लागली आहे. यामुळे हिवाळ्यात प्रकृती सांभाळण्याचा सल्ला जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्यावतीने देण्यात आला आहे.

वाढत्या थंडीत प्रकृतीत बिघाड होण्याची दाट शक्‍यता असते. त्यामुळे चौरस आहाराबरोबरच उबदार कपड्यांचा पेहराव असणे आवश्‍यक असल्याचे जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांनी गुरुवारी (ता.16) सांगितले.

हिवाळ्यात तापमान घसरल्याने सर्दी, खोकला यासारख्या संसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढत असते. त्याचप्रमाणे श्‍वसनाचे विकार, दमा, ऍलर्जी, जुना दमा हिवाळ्यात उचल खात असल्याने श्‍वसनाचे आजार वाढत आहेत. न्यूमोनिया बरोबरच हृदयविकाराचे प्रमाणही वाढण्याचा धोका असतो. शिवाय बालकांमध्ये डायरिया, सर्दी, खोकला, डेंगीची लागण होण्याचे प्रमाण वाढण्याची शक्‍यता असते, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

डॉ. पवार म्हणाले, ""सभोवतालच्या वातावरणात निर्माण झालेल्या गारव्याचा त्वचेवर परिणाम होत असतो. परिणामी ऍक्‍झिमा, सोरायसिस, त्वचा कोरडी होणे, ड्रायनेस, ऍटापिक डर्माटायसिस यासारख्या आजारांच्या प्रमाणात मोठी वाढ होते. यापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी साबणाचा कमी वापर करणे आणि उत्तम दर्जाच्या माईश्‍चरायझरचा अधिक वापर करणे आवश्‍यक असते. तसेच आहारात मेथी, अंडी, गरम पेय (उदा. चहा, कॉफी), जास्त कॅलरीज असलेले पदार्थांचा समावेश करणे आवश्‍यक आहे.''

हिवाळ्यातील आजार
- अपचनाचा त्रास वाढतो
- अंग, डोके आणि कानदुखीसारखे आजार वाढतात
- सर्दी, खोकला, ताप येण्याच्या प्रमाणात वाढ होते
- त्वचा कोरडी पडते. कधीकधी त्वचा खरमरीत होते
- त्वचा ताणली जाते
- ओठ, टाचा फुटतात, भेगा पडतात
- पडलेल्या भेगातून रक्त येण्याचा धोका असतो
 

हिवाळ्यातील आजारांवरील उपाययोजना
- कोमट पाणी प्यावे
- दररोज किमान अर्धा तास पायी चालावे
- आहारात स्निग्ध पदार्थांचा वापर करावा
- सकाळी लवकर उठावे, अति जागरण टाळावे
- जड अन्न घेणे वर्ज्य करावे
- मसालेदार पदार्थ प्रमाणात खावेत
- दुपारी बारा व रात्री आठ वाजण्यापूर्वी जेवण करावे
- तेल, उठणे लावून अभ्यंग स्नान करावे
- दुचाकीवरून प्रवास करताना उबदार कपडे घालावेत. चेहरा झाकून घ्यावा
- हिवाळ्यातील आजाराची लक्षणे दिसताच, त्वरित डॉक्‍टरांशी संपर्क साधावा

हिवाळ्यात दमा, ऍलर्जी, व्हायरल इन्फेक्‍शन यासारखे श्‍वसनाचे विकार वाढतात. बऱ्याचदा हृदयविकाराचे प्रमाण वाढते. यापासून बचावासाठी शक्‍य झाले तर थंडीत बाहेर पडू नये, आहार चौरस असावा. प्रदूषण वाढल्याने लहान
मुलांमध्ये मुख्यतः थंडीत सर्दी, खोकल्यासारखे संसर्ग होतात. शहरात "आरोव्ह'चे पाणी दिले जाते; परंतु जेथे शुद्ध पाणी शक्‍य नसेल, अशा पालकांनी मुलांना उकळून पाणी पाजावे. संसर्ग झालेला असेल, तर शाळेत पाठवू नये. कारण त्यामुळे दुसऱ्याला लागण होण्याची शक्‍यता असते- डॉ. भगवान पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ Series: अजित आगरकर OUT, न्यूझीलंड दौऱ्यासाठी रोहित शर्माचा खास 'माणूस' निवडणार संघ; मीटिंग कधी होणार?

'दृश्यम ३' मध्ये गायतोंडेची दहशत दिसलीच नाही' म्हणणाऱ्या मराठी अभिनेत्याला नेटकऱ्यांनी सुनावलं; म्हणाले- तुम्ही लोक

Navi Mumbai: नवी मुंबईत १६ तास पाणीपुरवठा बंद, सात विभागांवर परिणाम; पाणी जपून वापरण्याचे आवाहन

Dapoli Projects,: तीन प्रकल्पाविरोधात ग्रामस्थांचा तहसील कार्यालयावर धडक मोर्चा; दाभोळ अणुऊर्जा, चिखलगाव बॉक्साइट व देवके नवेनगर प्रकल्प रद्द करण्याची मागणी!

Latest Marathi News Live Update : एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील पुण्याच्या दिशेने रवाना

SCROLL FOR NEXT