sharad pawar sakal media
पुणे

कर्ज फिटेपर्यंत जपून कारभार करा - शरद पवार

पुढील वर्षभरात आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे दर ३२०० रुपये प्रतिक्विंटलच्या आसपास स्थिर राहतील

सकाळ वृत्तसेवा

सोमेश्वरनगर: ‘‘उसाचे क्षेत्र वाढत असल्याने विस्तारीकरण करत आहात ही चांगली बाब आहे. मात्र, विस्तारवाढ करताना कर्ज उभे करावे लागणार आहे. त्यामुळे काही काळ दरासाठीचे भांडण टाळा. कर्ज फिटेपर्यंत जपून कारभार करा. कर्जातून बाहेर पडल्यावर वाढलेल्या प्रकल्पांमुळे उत्पन्नवाढीचा फायदा तुम्हालाच मिळणार आहे,’’ असा वडिलकीचा सल्ला माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी दिला. तसेच इथेनॉल निर्मितीवर भर द्या, अशी सूचनाही त्यांनी केली. सोमेश्वरचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी याबाबत माहिती दिली.

येथील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या नवनिर्वाचित संचालक मंडळाशी गोविंदबाग (ता. बारामती) या निवासस्थानी पवार यांनी हितगूज केले. याप्रसंगी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, सोमेश्वरचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, उपाध्यक्ष शैलेश रासकर, माजी अध्यक्ष राजवर्धन शिंदे, संचालक विश्वास जगताप, संग्राम सोरटे, लक्ष्मण गोफणे, अभिजित काकडे, प्रणिता खोमणे आदी उपस्थित होते.

पवार म्हणाले, ‘‘पुढील वर्षभरात आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे दर ३२०० रुपये प्रतिक्विंटलच्या आसपास स्थिर राहतील. साखरनिर्मितीसोबत पुढील काळात इथेनॉलकडे अधिकाधिक लक्ष द्यावे. विस्तारीकरणाच्या कालावधीत कर्जफेड होईपर्यंत काळजीपूर्वक काम करावे.’’

संचालक सुनील भगत यांनी, माजी उपाध्यक्ष रामचंद्र भगत यांच्या स्मृतिप्रित्यर्थ श्रीराम शेती समूह उभारला असून त्यामार्फत एक डोळा ऊस लागवड पध्दतीचा अवलंब करत असल्याची माहिती दिली. यावर पवार यांनी किती फुटांवर लागवड होते, किती उत्पन्न मिळते याची माहिती घेतली. संचालक ऋषिकेश गायकवाड यांनी, मागील तीन वर्षात एकट्या सोमेश्वरच्या कार्यक्षेत्रात १ लाख ३३ हजार टन ऊस जळाला आहे. यामध्ये वीजकंपनीच्या हलगर्जीपणामुळे जळाल्याचे प्रमाण बहुतांश असून कंपनी नुकसान भरपाई देत नाही, यास्तव पूर्ण वेळ स्वतंत्र अधिकारी नेमावा, असे निवेदन पवारांना देत चर्चा केली.

ऊसदराचे कौतुक

सोमेश्वरने मागील हंगामात प्रतिटन ३१०० रुपये इतका चांगला दर दिला. त्यामुळे मला राज्यात इतरत्र गेल्यावर ऊस उत्पादक विचारतात, ‘‘तुमच्या तालुक्यातील सोमेश्वरने ३१०० दर कसा काय दिला, आम्हाला का मिळत नाहीत,’’ अशा शब्दांत शरद पवार यांनी सोमेश्वरच्या दराचे कौतुक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT