puneuniversity
puneuniversity 
पुणे

विद्यापीठ अधिसभा किमान दोन दिवस घ्या

सकाळ वृत्तसेवा

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा विस्तार मोठा असल्याने अनेक प्रश्‍न, इतर विषय चर्चेला येतात; पण विद्यापीठाची अधिसभा केवळ एकदिवस होत असल्याने चर्चेला पुरेसा वेळ मिळत नाही. त्यामुळे ही अधिसभा किमान दोन दिवस व्हावी. तसेच वर्षातून चार बैठका व्हाव्यात, अशी मागणी सदस्यांनी केली.

पुणे विद्यापीठाची अधिसभा ऑक्‍टोबर महिन्यात होणार होती; परंतु विधानसभा निवडणुकीमुळे ही सभा पुढे ढकलण्यात आली. ती शनिवारी (ता. १४ ) पार पडली. अधिसभेत स्थगन प्रस्ताव, ठराव, प्रश्‍नोत्तरे यासह कुलगुरूंचे भाषण, त्यावरील प्रश्‍न, लेखापरीक्षण अहवाल व त्यावरील प्रश्‍न यावर चर्चा करण्यात आली. 

ही चर्चा होत असताना अजून बरेच काम शिल्लक आहे, त्यामुळे जास्त चर्चा न करता प्रस्तावांवर, प्रश्‍नांवर व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीमध्ये चर्चा करून त्यावर धोरणात्मक निर्णय घेऊ, असे प्रशासनाकडून सांगितले जात होते. चर्चेला मिळणार अपुरा वेळ यावर अधिसभा सदस्य अमित पाटील यांनी प्रश्‍न उपस्थित केला. इतर विद्यापीठांच्या तुलनेत पुणे विद्यापीठाअंतर्गत अनेक महाविद्यालये येतात. याचा विस्तार मोठा आहे. त्यामुळे यावर चर्चा करताना वेळ कमी पडतो. या अधिसभेला महत्त्वाचे स्थान आहे, त्यामुळे शैक्षणिक, प्रशासकीय विषयांवर सखोल चर्चा होणे अपेक्षित आहे. तसेच नाशिक, नगर येथून सदस्य येतात, त्यामुळे अधिसभा केवळ एक दिवस न ठेवता दोन दिवसांची घ्यावी व वर्षातून दोनऐवजी चार सभा व्हाव्यात, अशी मागणी पाटील यांनी केली. तसेच राजीव साबडे यांनीही अर्थसंकल्पीय अधिसभा तीन दिवस व साधारण अधिसभा दोन दिवस घ्यावी, असा ठरावही दिला होता. 

अधिसभेचे कामकाज राज्यपाल कार्यालयातून निश्‍चित होते. यात चर्चेसाठी पुरेसा वेळ मिळावा यासाठी दोन दिवस बैठक व्हावी, यासाठी पाठपुरावा केला जाईल. तसेच बैठकांची संख्या वाढविण्यासाठीही प्रयत्न केले जातील. 
- डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S Jaishankar: ...तर पेट्रोलचे दर 20 रुपयांनी वाढले असते; परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचे वक्तव्य चर्चेत

RTE Maharashtra: पालकांना मोठा दिलासा! RTE च्या सुधारणेला हायकोर्टाची स्थगिती; नवे नियम तुर्तास होणार नाहीत लागू

Rohit Sharma IPL 2024 : सुट्टी नाही! मेगा लिलावासाठी रोहितला खेळावेच लागणार... माजी विकेटकिपरने कोणते संकेत दिले?

Share Market Closing: शेअर बाजाराने पुन्हा केली निराशा; मिडकॅप-स्मॉलकॅपमध्ये मोठी घसरण, गुंतवणूकदारांचे नुकसान

Naresh Goyal News : जेट एअरवेजचे चेअरमन नरेश गोयल यांना मोठा दिलासा! अखेर हायकोर्टाकडून जामीन मंजूर

SCROLL FOR NEXT