पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता sakal
पुणे

"अत्याचाराचे गुन्हे रोखण्यासाठी आवश्‍यक त्या उपाययोजना करणार"

शहरातील निवासी हॉटेल आणि लॉजबाबतच्या नियमांची योग्य अंमलबजावणी न करणा-यांवर पोलिसांचा वॉच असणार आहे, अशी माहिती पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी बुधवारी दिली.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : अल्पवयीन मुलीवर १३ आरोपींनी अत्याचार केल्याच्या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील सर्व प्रकारच्या प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आवश्‍यक ती सर्व उपाययोजन केली जाणार आहे. तसेच शहरातील निवासी हॉटेल आणि लॉजबाबतच्या नियमांची योग्य अंमलबजावणी न करणा-यांवर पोलिसांचा वॉच असणार आहे, अशी माहिती पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी बुधवारी दिली.

मित्राला भेटण्यासाठी बिहारला निघालेल्या १४ वर्षीय मुलीचे मदतीच्या बहाण्याने रिक्षातून अपहरण करत तिच्यावर १३ जणांनी सामूहिक बलात्कार केल्याचा प्रकार सोमवारी उघड झाला आहे. त्या मुलीचे पुणे रेल्वे स्टेशनमधून अपहरण करण्यात आले होते. त्यामुळे या घटनेच्या निमित्ताने शहरातील प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. पुणे आणि शिवाजीनगर रेल्वे स्टेशन आणि वाकडेवाडी, स्वारगेट आणि पुणे स्टेशन येथील एसटी स्थानकातून दररोज हजारो प्रवाशांची ये-जा होत असते. त्यातील अनेक प्रवासी पुढे रिक्षा, पीएमपी आणि कॅबद्वारे प्रवास करतात. या प्रवासादरम्यान प्रवाशांची सुरक्षा वाढावी तसेच अत्याचार करणा-या प्रवृत्तीला आळ बसावा यासाठी पोलिस आराखडा तयार करीत आहेत. अत्याचार होण्याची शक्यता असलेले ठिकाणे त्यामाध्यमातून शोधली जाणार असून तेथे आवश्‍यक ते खबरदारीत्मक उपाय राबविले जाणार आहे, असे गुप्ता यांनी सांगितले.

नियमांचे उल्लंघन न करणा-यांवर कारवार्इ :

रिक्षा चालक, निवासी हॉटेल व लॉज चालक यांनी व्यवसाय करताना कोणते नियम पाळले पाहिजे, हे आधीच स्पष्ट करण्यात आलेले आहेत. मात्र त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या नियमांचे उल्लंघन करणा-यांवर देखील कडक कारवार्इ केली जार्इल, असे गुप्ता यांनी स्पष्ट केले.

विशेष पीपींच्या नियुक्ती करण्याची मागणी :

वानवडी पोलिस ठाण्यात दाखल असलेले सामूहिक बलात्काराच्या प्रकरणात सरकारची बाजू मांडण्यासाठी विशेष सरकारी वकील (पीपी) नियुक्ती करण्यासाठी पत्रव्यवहार केला जाणार आहे. पोक्सो कायद्यानुसार आरोपींवर वेळेत दोषारोपपत्र दाखल केले जाणार असून खटल्याची सुनावणी वेळेत सुरू होर्इल, असे गुप्ता यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Koregaon Bhima Inquiry : कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणात नवे वळण; ठाकरे यांचे आयोगासमोर प्रतिज्ञापत्र सादर!

"आमच्यात भांडण.." रितेशबरोबरच्या वादांच्या चर्चांवर रवी जाधव व्यक्त ; राजा शिवाजी सिनेमाबद्दल म्हणाले..

German Silver : चांदीला स्वस्त पर्याय म्हणून जर्मन कारागिरांनी तयार केला सेम टू सेम धातू, पण तुम्ही फसू नका; फरक कसा ओळखाल? जाणून घ्या

Ambegaon News : कपिल काळेंचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना प्रवेश; राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का!

White vs Brown vs Multigrain Bread: व्हाइट, ब्राउन की मल्टीग्रेन ब्रेड? वजन कमी करण्यासाठी काय आहे बेस्ट? एका क्लिकवर जाणून घ्या!

SCROLL FOR NEXT