Gram_Panchayat_Election 
पुणे

गाव कारभाऱ्यांचं नवं आरक्षण ठरलं; तहसीलदारांच्या बैठकीत सोडतीद्वारे झाला निर्णय

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे जिल्ह्यातील गाव कारभाऱ्यांची प्रवर्गनिहाय पदे मंगळवारी (ता.८) जाहीर करण्यात आली आहेत. यासाठी तालुकास्तरावर तहसीलदारांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत ग्रामपंचायतींचे तालुकानिहाय आरक्षण सोडतीद्वारे मंगळवारी (ता.८) जाहीर करण्यात आले आहे. हे नवीन आरक्षण आतापासून पुढे होणाऱ्या निवडणुकीपासून लागू होणार आहे. 

जिल्ह्यातील 1 हजार 408 ग्रामपंचायतींपैकी 1 हजार 400 सरपंचांचे आरक्षण मंगळवारी काढण्यात आले आहे. दर पाच वर्षांनी सरपंचपदाचे आरक्षण जाहीर केले जाते. आरक्षण जाहीर झाल्यानंतर होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीपासून या नवीन आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात येत असते. डिसेंबरअखेरपर्यंत पुणे जिल्ह्यातील 749 ग्रामपंचायतींची मुदत संपुष्टात येत आहे. यापैकी मुदत शिल्लक असलेल्या ग्रामपंचायतींचा अपवाद वगळता अन्य सर्व ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्यात आलेला आहे. त्यामुळे डिसेंबर संपताच पुढील वर्षी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात मुदत संपलेल्या सर्व ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुका होण्याची शक्‍यता आहे.

जिल्ह्यातील एकूण ग्रामपंचायतींपैकी 8 ग्रामपंचायती नव्याने स्थापन झालेल्या आहेत. त्यामुळे या नवीन ग्रामपंचायतींचे आरक्षण करण्यात आले नाही. उर्वरित 1 हजार 400 पैकी 114 ग्रामपंचायती या आदिवासी क्षेत्रातील (पेसा क्षेत्र) आहेत. त्यामुळे या पेसा क्षेत्रातील सर्वच्या सर्व ग्रामपंचायतींचे सरपंचपद हे अनुसूचित जमातीसाठी (एस.टी.) राखीव करण्यात आले आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतींच्या कारभाऱ्यांची आरक्षण सोडत काढण्यात आली नाही. केवळ यापैकी 58 जागा महिलांसाठी निश्‍चित करण्यात आल्या.

प्रवर्गनिहाय नवे आरक्षण (कंसात महिलांसाठीची पदे)

- अनुसूचित जाती (एस.सी.) - 125 (66).
- अनुसूचित जमाती (एस.टी.) - 58 (33).
- पेसा क्षेत्र (फक्त एस.टी.साठी) - 114 (58).
- नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) - 347 (177).
- सर्वसाधारण (खुले) - 756 (383).
- आरक्षण काढण्यात येणाऱ्या ग्रामपंचायती - 1400.
- महिलांसाठी राखीव गावांची संख्या - 717 (सर्व प्रवर्ग मिळून)
- खुल्या गटासाठीच्या ग्रामपंचायती - 683 (सर्व प्रवर्ग मिळून)

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sarvajan Pension Scheme: वृद्ध, विधवा अन् दिव्यांगांना दर महिन्याला थेट खात्यात पेन्शन; ‘सर्वजन पेन्शन योजने’साठी पात्रता काय?

Anganwadi Boxing: अंगणवाडीत बॉक्सिंगचे धडे! खेड्यातील चिमुकल्यांच्या डोळ्यात ऑलिम्पिकचे स्वप्न; महिला बॉक्सरच्या उपक्रमाची सर्वत्र चर्चा

Pension for Widows of Freedom Fighters: स्वातंत्र्यसैनिकांच्या विधवांनाही दरमहा २५ हजार पेन्शन; जाणून घ्या पात्रता अन् अर्ज प्रक्रिया

Nandini Krushak Samruddhi Yojana: गाई खरेदी अन् डेअरी व्यवसायासाठी ३१ लाखांपर्यंत सबसिडी; काय आहे 'नंदिनी कृषक समृद्धी योजना'?

Hair Growth Ladoo: दाट, लांबसडक आणि चमकदार केसांचे सिक्रेट; रोज सकाळी खा फक्त १ 'मॅजिक लाडू'!

SCROLL FOR NEXT