सिंबायोसीस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठ, किवळे - डेस्टिनेशन इंडिया परिषदेचे उद्‌घाटन करताना केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल निशंक. शेजारी डॉ.  शां. ब. मुजुमदार, डॉ. विनय सहस्रबुद्धे, डॉ. नितीन करमळकर व मान्यवर.
सिंबायोसीस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठ, किवळे - डेस्टिनेशन इंडिया परिषदेचे उद्‌घाटन करताना केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल निशंक. शेजारी डॉ. शां. ब. मुजुमदार, डॉ. विनय सहस्रबुद्धे, डॉ. नितीन करमळकर व मान्यवर. 
पुणे

आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी टास्क फोर्स - रमेश पोखरियाल

सकाळवृत्तसेवा

पुणे - देशात शिक्षणासाठी येणाऱ्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या वसतिगृह, खानावळ, व्हिसा व इतर शैक्षणिक समस्यांच्या निराकरणासाठी विद्यापीठ अनुदान आयोग, आयसीसीआर, मनुष्यबळ विकास मंत्रालय, परराष्ट्र मंत्रालय यांचा एकत्रित टास्क फोर्स गठित करण्यात येणार आहे, अशी माहिती मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी दिली.

किवळे येथील सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठात भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या (आयसीसीआर) वतीने दोनदिवसीय डेस्टिनेशन इंडिया परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. परिषदेच्या उद्‌घाटन समारंभानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी परिषदेचे अध्यक्ष खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे, सिंबायोसिसचे कुलपती डॉ. शां. ब. मुजुमदार, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, अनिल सहस्रबुद्धे, अखिलेश मिश्रा उपस्थित होते. जगभरातील विद्यार्थ्यांना भारतातील शिक्षणसंस्थांकडे आकर्षित करण्यासाठी आवश्‍यक नीतीची चर्चा परिषदेत होणार आहे.  

डॉ. विनय सहस्रबुद्धे म्हणाले, ‘‘आंतरराष्ट्रीय स्तरावर राजकीय, व्यापारी संबंधासाठी वेगवेगळ्या परिषदा कार्यरत आहेत; परंतु सांस्कृतिक आणि ज्ञानाच्या आदान-प्रदानासाठी कोणतीच परिषद अथवा संघटना कार्यरत नाही. भारताकडे असलेला संस्कृती आणि ज्ञानाचा ठेवा जगातील देशांसाठी मार्गदर्शक आहे. आयआयटीच्या धरतीवर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ डेमोक्रॅटिक गव्हर्नन्स आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ कल्चरल हार्मोनीची स्थापना करणे आवश्‍यक आहे.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

IPL 2024 MI vs SRH Live Score: हार्दिक-चावलाची भेदक गोलंदाजी, पण हेड- कमिन्सच्या फटकेबाजीमुळे हैदराबादचे मुंबईसमोर 174 धावांचे लक्ष्य

Hires Women to Seduce Men: पबमध्ये पुरुषांना भुरळ घालण्यासाठी महिलांची नियुक्ती; पोलिसांच्या छाप्यात धक्कादायक प्रकार उघड

Sunita Williams News : अभिमानास्पद! सुनीता विल्यम्स पुन्हा घेणार अंतराळात झेप; सोबत नेणार भगवद्‍गीता अन् 'ही' खास मूर्ती

SCROLL FOR NEXT