पुणे

coronavirus: पुणे शहरात कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यूदर रोखण्यासाठी टास्क फोर्स

सकाळवृत्तसेवा

पुणे - राज्यामध्ये पुणे शहरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढती संख्या चिंताजनक असून, मृत्यू दराचे प्रमाणही वाढत आहे. हा मृत्युदर रोखण्यासाठी तज्ञ डॉक्टरांची समिती (टास्क फोर्स) गठीत करण्यात आल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.

कोरोना बाधित गंभीर आणि अतिगंभीर रुग्णावर औषधोपचार करताना सुसूत्रता राहावी, यासाठी तज्ञांची तज्ञ डॉक्टरांची समिती गठीत करण्यात आली आहे. ही समिती रुग्णावर नेमके कोणते उपचार करावेत, तसेच तज्ञ मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याबाबत निर्णय घेईल. एखाद्या रुग्णास अन्य रुग्णालयात स्थलांतरित करावयाचे असल्यास त्याबाबत निर्णय घेणे तसेच कोरोना आजारावर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न करेल. 

डॉ. दिलीप कदम या टास्क फोर्सचे प्रमुख असून, त्यांच्यासह एकूण दहा तज्ञ डॉक्टरांचा यामध्ये समावेश आहे. डॉ. शिवा अय्यर, डॉ. भरत पुरंदरे, डॉ. प्रसाद राजहंस, डॉ. कपिल झिरपे, डॉ. जगदीश हिरेमठ, डॉ. अभय सदरे, डॉ. आरती किनीकर, डॉ. शितल धडफळे, डॉ. एस. ए.सांगळे यांचा या समितीमध्ये समावेश आहे.

कोविड क्रिटिकल केयर हॉस्पिटल्स : 

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना बाधित रुग्णांसाठी पाच कोविड क्रिटिकल केयर हॉस्पिटल्स निश्चित करण्यात आली आहेत. त्यात बी.जे. मेडिकल कॉलेज ससून रुग्णालय, भारती विद्यापीठ रुग्णालय, सिम्बॉयसिस हॉस्पिटल, नायडू रुग्णालय, पुणे आणि यशवंतराव चव्हाण मेमोरियल रुग्णालय, पिंपरी या पाच रुग्णालयांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महिलांना ऑफिसमध्ये बोलवायचा, नंतर स्वत:चे मूत्र पाजून...; कॅप्टन खरातचा विकृतपणा वाचून तळपायाची आग मस्तकात जाईल

X Down: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' डाऊन! कोट्यवधी युजर्सना तांत्रिक अडचणींचा फटका

कोकणाला डावलून केंद्राचा यूपीला मान! दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद, दादर-गोरखपूर ट्रेन सुरू; वर्षानुवर्षांच्या मागणीवर पाणी

Baramati Vidhan Sabha: बारामती पोटनिवडणूक काँग्रेस लढवणार? शरद पवार गटाच्या भूमिकेवर केलं भाष्य

Malegaon Crime : राष्ट्रवादी कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; मारेकरी सीसीटीव्हीत कैद, आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु

SCROLL FOR NEXT