पुणे : कोरोनाच्या संकटामुळे आमचे काम गेले. हातावर पोट असल्याने सध्या आम्हाला दोन वेळचं जेवण मिळणं अवघड आहे. त्यामुळे आता जगायचं कसं असा प्रश्न आमच्यापुढे आहे. आता तरी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने आमचे प्रश्न सोडवावेत, अशी विनवणी शहरातील असंघटित-अंगमेहनती मजूर करीत आहेत.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
मंडळाकडे प्रलंबित मागण्यांसाठी "दगडखाण असंघटित कामगार विकास परिषदे'च्या माध्यमातून आज अपर कामगार आयुक्तालयासमोर "ताटली सत्याग्रह' करण्यात आला. शहरातील अनेक कष्टकरी त्यात सहभागी झाले होते. कोविड-19 च्या काळात राज्यकर्ते व प्रशासनाने असंघटित, अंगमेहनती आणि कष्टकरी कामगारांच्या दृष्टीने योग्य उपाययोजना केल्या नाहीत. दिल्ली सरकारने प्रत्येक असंघटित कामगाराच्या खात्यांवर पाच, हरियाना व पंजाब सरकारने चार हजार 500 तर उत्तर प्रदेश सरकारने पाच हजार रुपये जमा केले. कष्टक-यांची उपासमार थांबण्यासाठी इतर राज्यातील सरकारने मोफत 20 किलो गहू व 15 किलो तांदूळ दिले. मात्र राज्य शासनाने मजुरांना सरसकट अनुदान व अन्न-धान्य पुरवठा करण्यासाठी ठोस पावले उचललेली नाहीत, असे परिषदेचे अध्यक्ष ऍड. बस्तू रेगे यांनी सांगितले.
शेतकरयांपुढे एकीकडे असेल 'काटा' दुसरीकडे नोटा : रावसाहेब दानवे
नोंदणीकृत सदस्यांबाबत या आहेत मागण्या ः
- मंडळाचे पाच वर्ष सभासदत्व घेतलेल्या सदस्यांना प्रतिवर्षी नूतनीकरणाची अट रद्द करावी
- मार्चपासून दरमहा पाच हजार रुपयांचा उदरनिर्वाह निधी द्यावा
- बचत गटामार्फत मोफत माध्यान्ह भोजन द्यावे
- सदस्य व त्यांच्या कुटुंबीयांची मोफत आरोग्य तपासणी करावी व त्यांचा विमा काढावा
- कोरोनामुळे मृत्यू झालेल्या सदस्यांच्या वारसांना पाच लाखांची मदत करावी
- महिला सदस्यांना पर्यायी स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी 25 हजार रुपये द्यावेत
- मुलांच्या शिक्षणासाठी 25 हजार ते दोन लाखापर्यंतचा निधी द्यावा
- कामगारांच्या घर बांधणीसाठी किमान पाच लाखांची मदत करावी.
पोलिस मामाने लढवली शक्कल... पीकअप झाली अॅम्ब्युलन्स...
(editing : Sharayu kakade)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.