tax policy Two parts of income tax to avoid recovery pune
tax policy Two parts of income tax to avoid recovery pune Sakal
पुणे

Pune News : वसुलीचा गोंधळ टाळण्यासाठी मिळकतकराच्या बिलाचे दोन भाग

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे महापालिकेने ९७ हजार ५०० नागरिकांना मिळकतकराच्या फरकाची ४० टक्के रक्कम भरा असे अशी नोटीस दिली. पण या नागरिकांना ४० टक्के रक्कम किती आणि चालू वर्षातील कराची रक्कम किती हे समजण्यास गोंधळ होत होता. त्यामुळे आता आॅनलाइन बिलामध्ये दोन भाग करणयात आले आहेत, त्यामुळे नागरिकांना चालू वर्षातील कराची रक्कम भरून दंड टाळता येणार आहे. हे बिल महापालिकेच्या संकेतस्थळावर पाहता येईल.

महापालिकेतर्फे १९७० पासून पुणेकरांना मिळकतकरावर ४० टक्के सवलत दिली जात होत. ही सवलत रद्द करून त्याची आॅगस्ट २०१९ पासून अंमलबजावणी सुरू झाली आहे. पहिल्या टप्प्यात ज्यांची एकापेक्षा दोन घरे आहेत किंवा ज्यांनी भाडेकरू ठेवले आहेत, अशी ९५ हजार ५०० नागरिकांची ४० टक्के ही सवलत काढून घेण्यात आली.

यामध्ये नागरिकांना १० हजारापासून ते २५ हजारापेक्षा रक्कमेची थकबाकी वसूल केली जाणार जाणार आहे. नागरिकांच्या टीकेनंतर आयुक्त विक्रम कुमार यांनी ही रक्कम वसुल करण्यास स्थगिती दिली. पण मिळकतकराच्या बिलातील रक्कम किती भरायची यावरून मिळकतधारकांचा गोंधळ सुरू झाला.

हा गोंधळ कमी करण्यासाठी मिळकतधारकांना ४० टक्के वसुलीची रक्कम किती आणि चालु वर्षातील करपात्र रक्कम किती असे फरकांचे बिल www.propertytax.punecorporation.org या महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले आहे. ४० टक्केच्या वसुलीवर आयुक्तांनी स्थगिती दिली असल्याने त्या बिलावर त्या संदर्भात स्पष्ट सूचना दिली आहे.

‘‘४० टक्के वसुलीची रक्कम किती आणि चालु वर्षातील कर किती हे नागरिकांना कळावे यासाठी आॅनलाइन बिलामध्ये तशी ही रक्कम विभागून दाखविण्यात आली आहे. ४० टक्के रकमेच्या वसुलीवर सध्या स्थगिती असल्याने ती रक्कम न भरता जी चालु वर्षातील रक्कम भरता येईल.’’

-डॉ. कुणाल खेमनार , अतिरिक्त आयुक्त, महापालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushma Andhare: सुषमा अंधारेंना घ्यायला आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश, कारण अस्पष्ट

Amitabh Bachchan: बिग बींचं एक ट्वीट अन् नव्या वादाला सुरुवात; भाजप-आदित्य ठाकरेंमध्ये ट्विटर वॉर, नेमकं प्रकरण काय?

Sangli Lok Sabha : सांगलीच्या जागेबाबत शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले, याची चर्चा न होता थेट टीव्हीवरच..

Trucks Carrying Cash: चार ट्रक, हजारो कोटींच्या मळलेल्या नोटा अन् पोलीस; वाचा चित्रपटालाही लाजवेल असे थरारनाट्य

Latest Marathi News Live Update : सांगलीत भाजपचे दोन उमेदवार आमच्यासमोर- संजय राऊत

SCROLL FOR NEXT