Eligibility test 
पुणे

‘टीसीएस’ची राष्ट्रीय स्तरावरील पात्रता परीक्षा सर्वांसाठी खुली

सकाळवृत्तसेवा

पुणे - तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल आणि योग्य संधी मिळत नसेल तर चिंता करू नका. कारण, आता टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्यावतीने राष्ट्रीय स्तरावरील पात्रता परीक्षा सर्वांसाठी खुली करण्यात आली आहे. यामुळे तुमच्या कौशल्याच्या आधारे नोकरी तर मिळेल, पण त्याचबरोबर विविध कॉर्पोरेट्‌सला त्यांच्या अपेक्षेनुसार योग्य उमेदवारही मिळणार आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

राष्ट्रीय स्तरावरील पात्रता परीक्षेद्वारे आम्ही नोकरीच्या शोधात असलेल्या लाखो युवकांना देशाच्या आघाडीच्या कॉर्पोरेट्‌ससोबत काम करण्याच्या संधी देत आहोत. कंपन्यांनाही देशभरातून मोठ्या प्रमाणावर निपुण, पात्र उमेदवार मिळवता येतील. 
- वेन्गुस्वामी रामास्वामी, टीसीएस आयओएनचे जागतिक प्रमुख.

काय आहे पात्रता परीक्षा?
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या ‘आयओएन’ विभागाची ही राष्ट्रीय पात्रता परीक्षा (एनक्‍यूटी) आहे. यात सहभागी होणाऱ्या कॉर्पोरेट्‌सना त्यांच्याकडील नवीन कर्मचारी भरतीसाठी सामाईक प्रवेश परीक्षा म्हणून वापरता येईल.

परीक्षेसाठीच पात्रता?
दोन वर्षांपर्यंतच्या कामाचा अनुभव असलेले युवा कर्मचारी, सध्या पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमांत शिकत असलेले कोणत्याही शाखेचे विद्यार्थी.

कोणत्या क्षेत्रात मिळणार संधी?
माहिती तंत्रज्ञान (आयटी), बीएफएसआय, उत्पादन, फार्मा, एफएमसीजी क्षेत्रे यातील कंपन्या आणि टीसीएसमध्ये देखील उपलब्ध नोकरीच्या संधींची माहिती आणि तिथपर्यंत पोचण्यासाठीची सामाईक खिडकी म्हणून ही टेस्ट उपयुक्त ठरते.

परीक्षा कशी देणार?
ही परीक्षा उमेदवार आपापल्या घरून देऊ शकतात.  परंतु ज्यांच्याकडे पायाभूत सुविधा नसतील ते जवळच्या ‘टीसीएस आयओएन सेंटर’मध्ये येऊन परीक्षा देऊ शकतात.

केव्हा, कितीवेळा परीक्षा देऊ शकता?
एनक्‍यूटी प्रत्येक तिमाहीमध्ये घेतली जाईल आणि तिचा स्कोअर दोन वर्षांसाठी वैध मानला जाईल. पहिली टेस्ट निःशुल्क उपलब्ध असणार असून, ती २४ ते २६ ऑक्‍टोबर या कालावधीत होईल. यासाठी १७ ऑक्‍टोबरपर्यंत नोंदणी करायची आहे. उमेदवार आपले स्कोअर्स सुधारण्यासाठी अनेक वेळा ही टेस्ट देऊ शकतात.   

परीक्षेचे स्वरूप काय असणार? 
परीक्षेमध्ये तोंडी, संख्यात्मक आणि तर्क क्षमतांचा समावेश असून, त्याद्वारे उमेदवारांचा सामान्य राष्ट्रीय पात्रता गुणांक (एनक्‍यूटी स्कोअर) काढला जातो. उमेदवारांच्या आकलन क्षमतांचे निदर्शक म्हणून कॉर्पोरेट्‌सना हा एनक्‍यूटी स्कोअर सादर केला जातो.

परीक्षेसाठी कुठे अर्ज कराल?
https://learning.tcsionhub.in/hub/national-qualifier-test/  या संकेतस्थळावर अर्ज करता येईल.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: २ कोटींची सुपारी, आरोपींसोबत धनंजय मुंडेंचा संवाद...; मनोज जरांगेंनी थेट पुराव्याच्या ऑडिओ क्लिप ऐकवल्या

Thane News: 27 गावं तरी स्वतंत्र नगर परिषद नाही, आमदार-खासदार आक्रमक; कल्याण शीळ रोडवर सर्वपक्षीय आंदोलन

Latest Marathi News Live Update : पुण्यातील कोरेगाव पार्क जमीन घोटाळा प्रकरणी पार्थ पवारांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

Mumbai Happiest City: कधीच न झोपणारी मुंबई ठरली ‘हॅप्पिएस्ट सिटी’! आनंदी शहरांच्या यादीत मिळाला पाचवा क्रमांक

Dhananjay Munde: राज्यातल्या बड्या नेत्यांच्या गाड्यांमध्ये धनंजय मुंडेंनी मोबाईल लपवले? आरोपांवर स्वतःच दिलं स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT